Join us  

Video: स्कॉटलँडमध्ये सोनालीने केला 'काठी न् घोंगडी..'वर जबरदस्त डान्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 6:20 PM

Sonalee kulkarni: अलिकडेच सोनालीच्या 'व्हिक्टोरिया' या आगामी चित्रपटाचं स्कॉटलँडमध्ये चित्रीकरण पार पडलं.

मराठी कलाविश्वातील अप्सरा अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम प्रयत्नशील असते. त्यामुळे तिने कोणत्याही नव्या ठिकाणाला भेट दिली की त्याचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. सध्या सोनालीने शेअर केलेला एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. स्कॉटलँडमध्ये सोनालीने चक्क मराठी गाण्यावर ठेका धरला आहे.

अलिकडेच सोनालीच्या 'व्हिक्टोरिया' या आगामी चित्रपटाचं स्कॉटलँडमध्ये चित्रीकरण पार पडलं. या चित्रीकरणादरम्यानचे अनेक फोटो, व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र, अभिनेता अक्षय कुलकर्णीसोबत तिने शेअर केलेला डान्स व्हिडीओ चांगलाच चर्चेत येत आहे.

'अप्सरा'ने शेअर केले साडीतील घायाळ करणारे फोटो; सोनाली कुलकर्णीचे फोटो चर्चेत

सोनालीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती आणि अक्षय चक्क काठी नं घोंगडं घेऊ द्या की या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे कडाक्याच्या थंडीत त्यांनी हा डान्स केला आहे. "हे सगळं केवळ freezing temperature मध्ये स्वत:ला warm ठेवण्यासाठी बरं का", असं कॅप्शनही तिने या व्हिडीओला दिलं आहे.

दरम्यान, सोनाली इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रीय असून कायम ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी प्रयत्न करत असते. कधी सहकलाकार तर कधी तिच्या नवऱ्यासोबत ती असे भन्नाट डान्स व्हिडीओ शेअर करते.

टॅग्स :सोनाली कुलकर्णीसेलिब्रिटीसिनेमा