Join us

लव्हस्टोरी! ‘तो अजिबात आवडला नव्हता..,’ म्हणणारी स्पृहा जोशी वरदच्या प्रेमात कशी पडली?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 6:11 PM

Spruha Joshi : स्पृहा जोशीबद्दल सगळेच जाणताच. पण तिचा ‘अहो’ अर्थात तिच्या नवऱ्याबद्दल फार कमी लोकांना ठाऊक आहे. 6 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 2014 साली दोघांचं लग्न झालं. या दोघांची लव्हस्टोरी चांगलीच इंटरेस्टिंग आहे.

Spruha Joshi Love Story : स्पृहा जोशी (Spruha Joshi) हिची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. अभिनेत्री, अँकर, कवयित्री म्हणून ती घराघरात ओळखीची आहे. स्पृहाने झी मराठीच्या ‘दे धमाल’ या मालिकेतून अभिनयास सुरूवात केली आणि यानंतर कधीच मागे वळून पाहिलं नाही. पुढे मालिका, सिनेमे, सूत्रसंचालन, लेखन अशा क्षेत्रात तिनं मोठं नाव कमावलं. स्पृहा जोशीबद्दल सगळेच जाणताच. पण तिचा ‘अहो’ अर्थात तिच्या नवऱ्याबद्दल फार कमी लोकांना ठाऊक आहे.

स्पृहाच्या नवऱ्याचं नाव वरद लघाटे (Varad Laghate ) आहे. 6 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 2014 साली दोघांचं लग्न झालं. या दोघांची लव्हस्टोरी चांगलीच इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, लग्नाआधी वरद स्पृहाला अजिबात आवडला नव्हता. मग लग्न कसं झालं तर स्पृहानं अलीकडे एका मुलाखतीत याचा खुलासा केला.

 अनुरूप विवाह संस्थेच्या एका कार्यक्रमात स्पृहा जोशी आणि तिचा नवरा वरद लघाटे हे जोडपं पहिल्यांदा एकत्र उपस्थित होतं. या जोडीनं मस्तपैकी मुलाखत दिली. शिवाय आपली लव्हस्टोरीही सांगितली.  स्पृहा व वरदची पहिली भेट कशी झाली तर कॉलेजात. होय, स्पृहा आणि वरद कॉलेजमध्ये असताना एका वृत्तपत्राचे कॉलेज प्रतिनिधी म्हणून काम करायचे. तिथे त्यांची ओळख झाली. सुरुवातीला  दोघांची एकमेकांबद्दलची मतं फार काही चांगली नव्हती. 

वरदबद्दलचं स्पृहाचं पहिलं इम्प्रेशन फारच वाईट होतं. तिला तो अजिबात आवडला नव्हता. त्याला बातम्या दाखवायला लागायच्या, विषय सांगावे लागायचे आणि स्पृहाला हे सगळं अजिबात आवडायचं नाही. वरदचं सुद्धा फार काही वेगळं नव्हतं. वरदला सुद्धा स्पृहा एक वशिला लावून झालेली कॉलेज प्रतिनिधी वाटायची. मग त्यांच्यात प्रेम कसं फुललं?

स्पृहाने ही लव्हस्टोरी सांगितली. ती म्हणाली, ‘एका प्रोजेक्टवर आम्हाला जबरदस्तीने काम करावं लागलं. यात मी आणि वरद आम्ही दोघं महत्त्वाचे विभाग सांभाळत होतो. या प्रोजेक्टच्या निमित्तानं आमची मैत्री झाली. सुरूवातीला एकमेकांना फारसं आवडत नसूनही आमची मैत्री मात्र चांगलीच फुलली आणि मग आम्ही कधी एकमेकांच्या प्रेमात पडलो, हे आमचं आम्हालाही कळलं नाही. डेट करायला लागल्यावर सुरूवातीलाच आमचं हे नातं लग्नापर्यंत टिकणार, याची खात्री आम्हाला झाली होती. आमच्या लव्हस्टोरीमध्ये कोणी कोणाला रोमँटिक प्रपोज केलं नाही. आम्ही एकमेकांना वेळ दिला, नात्यासाठी वेळ घेतला. सगळं बºयापैकी स्वच्छ दिसत होतं. त्यामुळे आम्ही लग्नाचा निर्णय घेतला.’

स्पृहा व वरद दोघांनीही 2014 मध्ये लग्न केलं. तेव्हापासून दोघंही आनंदात संसार करत आहेत. स्पृहा चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. पण वरदचा चित्रपटसृष्टीशी काहीही संबंध नाही. वरदने त्याची कारकीर्द एक पत्रकार म्हणून सुरू केली. यानंतर  पत्रकारितेचे क्षेत्र सोडून वरद मार्केटींग प्रोफेशनकडे वळला. 

टॅग्स :स्पृहा जोशी