Join us

‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’मध्ये सुरुची अडाकरची एन्ट्री; साकारणार 'ही' भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 18:15 IST

Suruchi Adakar:सुरुची या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.

शिक्षणासाठीची जिद्द आणि स्वप्नांची ओढ, असा वेगळा विषय हाताळत अलिकडेच छोट्या पडद्यावर ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेत बायोच्या शिक्षणाचा आणि शिक्षणासाठी ती करत असलेल्या संघर्षाचा प्रवास हळूहळू उलगडत आहे. या मालिकेत लवकरच अभिनेत्री सुरुची अडारकर (Suruchi Adarkar) हिची एन्ट्री होणार आहे. सुरुची या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.

अनू देसाई असे सुरुचीच्या व्यक्तिरेखेचे नाव असून ती शिक्षिकेच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येते आहे. या मालिकेच्या माध्यमातून पहिल्यांदाच सुरुची शिक्षिकेच्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. डॉक्टर व्हायचं स्वप्न बघणारी बयो आणि तिची आई भारती यांच्या आयुष्यात शुभंकरच्या येण्याने चांगले दिवस आले होते. पण आता अचानकपणे भारतीच्या जाण्याने बयोवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. इतकंच नाही तर शुभंकरदेखील काही काळ बयोला सोडून गेला होता. त्यामुळे बयोला मोठा धक्का सहन करावा लागत आहे. यामध्येच बयोच्या आयुष्यात अनुची एन्ट्री होणार आहे. त्यामुळे आता शिक्षिका अनू देसाईच्या येण्याने बयोच्या आयुष्यात काय बदल होतील, हे पाहायला मिळेल. 

दरम्यान, बयोचे डॉक्टर होण्याचे स्वप्न आता कसं पूर्ण होईल. तिचा सगळ्यांत मोठा आधार तिच्यासोबत नसणार आहे आणि आता शुभंकर तिची काळजी कशी घेईल हेही पाहता येईल. त्यातच शिक्षिका अनू देसाईच्या येण्याने बयोच्या आयुष्यात एक आशेचा किरण आला असून तिच्या येण्याने बयोला कशी मदत होईल, हे मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळेल.  

टॅग्स :सुरुची आडारकरटेलिव्हिजनसेलिब्रिटी