Join us

सुरुची अडारकरच्या हळदीचे खास फोटो समोर, पियुषसोबत दिली रोमँटिक पोज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 13:28 IST

सध्या त्यांच्या लग्नाची चर्चा मराठी मनोरंजनविश्वात रंगली आहे.

मराठी अभिनेत्री सुरुची अडारकरने (Suruchi Adarkar) नुकतंच अभिनेता पियुष रानडेसोबत (Piyush Ranade) लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नाचे, रिसेप्शन आणि सुरुचीच्या मेहंदीचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता सुरुचीने तिच्या हळदीचे फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये सुरुची आणि पियुष रोमँटिक पोज देत आहेत. सध्या त्यांच्या लग्नाची चर्चा मराठी मनोरंजनविश्वात रंगली आहे.

गडक केशरी रंगाचा सुंदर ड्रेस, आकर्षक हेअरस्टाईल शा लूकमध्ये सुरुची तिच्या हळदीसाठी सजली होती. तर पियुषनेही गडद केशरी रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचा पायजमा घातला होता. सुरुचीने पोस्ट केलेल्या दोन फोटोंमध्ये दोघंही रोमँटिक पोज देत आहेत. दोघांना हळद लागली असून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच सर्वकाही सांगून जात आहे. दोघंही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याची झलक या फोटोंमधून स्पष्ट दिसून येतेय.

दरम्यान, सुरुची आणि पियुष यांनी त्यांचं नातं आणि लग्न कोणालाही कळू दिलं नाही. थेट लग्नाचे फोटो टाकून साऱ्यांना अचिंबत केलं. याविषयीसुद्धा तिने स्पष्टीकरण दिलं.  "सगळ्या गोष्टींमध्ये प्रायव्हसी जपणं, त्या खासगी ठेवणं हा माझा स्वभाव आहे. माझं व्यक्तिमत्वचं तसं आहे.  त्यामुळे मी आमच्या नात्याविषयी सुद्धा कोणाला कळू दिलं नाही. लग्न सुद्धा कुटुंबियांच्या उपस्थितीत खासगी पद्धतीने झालं", असंही तिने यावेळी सांगितलं.

टॅग्स :सुरुची आडारकरपियुष रानडेमराठी अभिनेतालग्न