Join us

'बहरला हा मधुमास'वर डान्स करताना अभिनेत्रीची लचकली कंबर? पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 06:00 IST

Swati deval: 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत झळकलेल्या स्वाती देवलचा भन्नाट व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर दररोज असंख्य ट्रेंड व्हायरल होत असतात. हे ट्रेंड सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण फॉलो करताना दिसून येतो. यामध्येच सध्या गेल्या काही दिवसांपासून 'महाराष्ट्र शाहीर' या आगामी सिनेमातील 'बहरला हा मधुमास नवा' हे गाणं तुफान व्हायरल झालं आहे. अनेकांनी या ट्रेंडी गाण्यावर रिल्सदेखील केले आहेत. यात, मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री स्वाती देवल हिने मात्र हटके पद्धतीने हा ट्रेंड फॉलो केला आहे.

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे स्वाती देवल. या मालिकेत तिने नेहाच्या (प्रार्थना बेहरे) वहिनीची भूमिका साकारली होती. ग्रे शेड असलेली ही भूमिका प्रेक्षकांना विशेष भावली. विशेष म्हणजे स्वाती खऱ्या आयुष्यातही तितकीच मस्तीखोर आणि मनमोकळ्या स्वभावाची असल्याचं पाहायला मिळतं. तिचा हाच स्वभाव तिने फॉलो केलेल्या ट्रेंडमध्ये दिसून येत आहे.

अलिकडेच स्वातीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये तिने नाचू किती, नाचू किती या गाण्यावर भन्नाट डान्स केला. मात्र, या व्हिडीओला तिने दिलेलं कॅप्शन जास्त इंटरेस्टिंग असल्याचं पाहायला मिळालं. ''मधुमास फुलल्याचा आनंद होऊन नाचले आणि... कंबर लचकली....'', असं कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ पोस्ट केला.

मराठीतल्या लोकप्रिय जोडीने फॉलो केला मधुमास ट्रेंड; पाहा स्वाती-तुषार देवलचा मजेशीर व्हिडीओ

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर या जोडीचा हा व्हिडीओ विशेष लोकप्रिय होताना दिसत आहे. आतापर्यंत अनेकांनी या गाण्यातील डान्स स्टेप फॉलो केल्या होत्या. मात्र, स्वातीने हटके स्टाइल करत नेटकऱ्यांचं मन जिंकलं आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजनसिनेमा