अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. तेजस्विनीने आजवर विविध सिनेमांमधून अन् मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली. शिवाय 'रानबाजार' सारख्या वेबसिरीजमधून तेजस्विनीने ओटीटी माध्यमावर सुद्धा स्वतःची छाप पाडली. तेजस्विनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून ती सामाजिक - राजकीय विषयांवर तिचं परखड मत व्यक्त करत असते. अशातच तेजस्विनीने ट्विटर X वर एक ट्विट केलंय. ज्याची चांगलीच चर्चा रंगलीय.
तेजस्विनीने ट्वि्ट केलंय की, "जनता मूर्ख नाही. सगळं जाणते. बेईमानी ओळखते. लक्षात ठेवणे !"तेजस्विनीने केलेल्या या ट्विटवर अनेकांनी तिला ट्रोल केलंय तर काहींनी तिच्या म्हणण्याला पाठिंबा दिलाय. काल निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाचं नाव अन् चिन्ह अजित पवार गटाकडे देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तेजस्विनीने हे ट्विट केलंय. त्यामुळे अनेक नेटिझन्सनी कमेंटमध्ये तेजस्विनीची चांगलीच शाळा घेतल्याचं दिसतं.
जेव्हा अजित पवारांनी बंड केलं होतं त्यानंतरही तेजस्विनीने नाव न घेता उपरोधिक ट्विट केलं होतं, "भेळ हवीये भेळ ???? सर्वोत्तम भेळ आमच्या महाराष्ट्रात मिळेल !!!!"तेजस्विनी पंडित मनसे प्रमुख राज ठाकरेंना जाहीर पाठिंबा देताना असते. राज ठाकरेंचे विचार आणि त्यांचे भाषणातील विविध मुद्दे तेजस्विनी तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तेजस्विनी आता आगामी स्वराज्य कनिका जिजाऊ सिनेमात जिजाऊंची भूमिका साकारताना दिसणार आहे.