Join us

मराठी अभिनेत्रीच्या लग्नाला ११ वर्ष पूर्ण, अमावस्येच्याच दिवशी बांधली आयुष्यभराची गाठ; वाचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 15:51 IST

लग्नाची तारखेचा किस्सा, अमावस्येलाच झाला विवाहसोहळा

मराठीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक म्हणजे उर्मिला निंबाळकर (Urmila Nimbalkar) आणि सुकीर्त गुमस्ते (Sukirt Gumaste). दोघंही आज यशस्वी कंटेंट क्रिएटर आहेत. युट्यूबवर त्यांचे लाखो सबस्क्रायबर्स आहेत. फॅशन, मेकअप या महिलांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर उर्मिला व्हिडिओ बनवते. तिला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो. तर सुकीर्तही ट्रॅव्हल आणि फूड व्लॉग करतो. या दोघांची लव्हस्टोरीही खूप इंटरेस्टिंग आहे. विशेष म्हणजे दोघांचं लग्न अमावस्येच्या दिवशी झालं होतं. काय आहे त्यामागचं कारण वाचा.

उर्मिला आणि सुकीर्तच्या लग्नाला आज ११ वर्ष पूर्ण झाले आहेत. ९ फेब्रुवारी २०१३ साली ते लग्नबंधनात अडकले. आज दोघंही लग्नाचा वाढदिवस थाटात साजरा करत आहेत. तसंच तीन वर्षांपूर्वी त्यांच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन झालं. उर्मिला आणि सुकीर्तच्या लग्नाची गोष्ट भन्नाट आहे. दोघांनी जेव्हा लग्न करण्याचं ठरवलं तेव्हा त्यांनी स्वत:च ९ फेब्रुवारी ही लग्नाची तारीख ठरवली. मात्र त्या दिवशी अमावस्या होती. सर्वांनी त्यांना या दिवशी लग्न करु नका असं समजावलं. पण दोघंही ठाम होते आणि त्यांनी त्याच दिवशी लग्न केलं.

म्हणून अमावस्येलाच केलं लग्न

९ फेब्रुवारी ही तारीख दोघांच्या आयुष्यात खूपच खास आहे. याच दिवशी दोघांनी एकमेकांसमोर प्रेमाची कबुली दिली होती. यापेक्षा शुभ दिवस कोणता असूच शकत नाही म्हणत ते या तारखेवर ठाम होते. मग अमावस्या असली तरी त्यांनी तारीख बदलली नाही. ठरलेल्या तारखेलाच त्यांनी आयुष्यभराची गाठ बांधली. तसंच अमावस्येला लग्न केलं तर कार्यालये स्वस्तात मिळतात असंही सुकीर्त एका मुलाखतीत म्हणाला होता. 

उर्मिला आणि सुकीर्त यांच्या मुलाचं नावही खूप खास आहे. अथांग असं त्यांनी नाव ठेवलं आहे. २०२१ मध्ये त्याचा जन्म झाला. दोघंही आता मुलाचा सांभाळ करतच यु्ट्यूब चॅनलही यशस्वीपणे चालवत आहेत.

टॅग्स :मराठी अभिनेताउर्मिला निंबाळकरलग्न