Join us

उषा नाईक यांच्यासोबत इंडस्ट्रीत झाला दुजाभाव?; पहिल्यांदाच व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 9:14 AM

Usha Naik: उषा नाईक यांनी कलाविश्वात मिळालेल्या वागणुकीविषयी खंत व्यक्त केली आहे.

'दैव देते', 'सत्वपरीक्षा', 'राखणदार', 'येऊ का घरात', 'एक हजाराची नोट' अशा कितीतरी गाजलेले सिनेमा देणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे उषा नाईकम(Usha Naik). बॅकग्राउंड डान्सर म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या उषा नाईक यांनी इंडस्ट्रीमध्ये जवळपास २ दशकांहून अधिक काळ काम केलं आहे.मात्र, या कामाची पोचपावली अद्यापही न मिळाल्याची खंत त्यांनी एका मुलाखतीमध्ये व्यक्त केली.

अलिकडेच उषा नाईक यांनी 'इट्स मज्जा' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या फिल्मी प्रवासाविषयी भाष्य केलं. मात्र, यावेळी बोलत असतांना त्यांनी एक खंतही व्यक्त केली.

"मला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला.पण, तो पुरस्कार घ्यायला मी तिथे गेले नाही. माझ्या मुलावर उपचार सुरु होते त्यामुळे डॉक्टरांच्या वाऱ्या सुरु होत्या. आणि, अशा परिस्थितीमध्ये सगळं सोडून तिथे पुरस्कार घ्यायला जाणं मला योग्य वाटत नव्हतं. त्यावेळी फिल्मफेअर अवॉर्डमध्ये मराठी कलाकारांना घेणं बंद केलं. आम्ही पुरस्कार देतो पण ही मराठी कलाकार मंडळी पुरस्कार घ्यायला येत नाहीत. यांना या पुरस्काराविषयी काही वाटत नसेल तर जाऊ दे, असं त्यावेळी बोललं जायचं. तेव्हापासून त्यांनी हा पुरस्कार देणं बंद केलं. त्यानंतर मग हा फिल्मफेअर पुरस्कार देण्यास रितेश देशमुख यांनी स्वतंत्रपणे सुरु केला. तेव्हा मी या पुरस्कार सोहळ्याला गेले होते. त्यावेळी मी तिथेही हे बोलून दाखवलं की माझ्यामुळे फिल्मफेअर अवॉर्ड बंद झाले होते. ते पुन्हा एकदा रितेश देशमुख यांनी सुरु केले", असं उर्षा नाईक म्हणाल्या.

पुढे त्या म्हणतात, "सिनेसृष्टीत काम करत असताना माझ्यावर बरेच अन्याय झाले होते. पण माझ्यावर झालेले हे सगळे अन्याय 'एक हजारच्या नोटेने' भरुन काढले. जवळपास १५-१६ पुरस्कार मला मिळाले. काम करणं हे मला चांगलंच माहित आहे. पण, आता अवॉर्ड मिळणं न मिळणं हा काही नशीबाचा भाग नाही. त्यासाठी लोकांची मर्जी लागते. हे मला नंतर नंतर कळत गेलं."

टॅग्स :सिनेमासेलिब्रिटीफिल्मफेअर अवॉर्ड