मराठी कलाविश्वातील दिलखुलास व्यक्तीमत्व म्हणजे वंदना गुप्ते ( vandana gupte). आजवरच्या कारकिर्दीमध्ये वंदना गुप्ते यांनी अनेक गाजलेल्या सिनेमा,मालिकांमध्ये काम केलं आहे. अलिकडेच त्या बाईपण भारी देवा या गाजलेल्या सिनेमात झळकल्या. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. अगदी बॉलिवूडकरांनीही या सिनेमाचं कौतुक केलं. अभिनयामुळे चर्चेत येणाऱ्या वंदना गुप्ते सध्या त्यांच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत येत आहेत. नुकताच त्यांनी त्यांच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
वंदना गुप्ते कलाविश्वासह सोशल मीडियावरही सक्रीय आहेत. त्यामुळे त्या कायम चाहत्यांसोबत काही ना काही शेअर करत असतात. यामध्येच त्यांनी तब्बल 51 वर्षांनी त्यांच्या लग्नातील फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे त्यांचा हा फोटो पाहून चाहते भारावून गेले आहेत. अनेकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
वंदना गुप्ते यांच्या लग्नाला नुकतेच 51 वर्ष पूर्ण झाले असून त्यांनी 52 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. त्यामुळे त्यांनी जोडीदारासोबत २ फोटो शेअर केले आहेत. यात पहिला फोटो त्यांच्या लग्नाचा आहे. तर, दुसरा फोटो हा अलिकडेच काढलेला आहे. विशेष म्हणजे सहजीवनाची 51 वर्ष कशी सरली हे त्यांनी या फोटोच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न केला आहे.
पहिल्यांदाच त्यांच्या लग्नातील फोटो त्यांनी शेअर केल्यामुळे त्या ऐन तारुण्यात कशा दिसायच्या याची झलक चाहत्यांना पाहायला मिळाली. विशेष म्हणजे त्या कमालीच्या सुंदर दिसत असून आजही त्यांच्या सौंदर्यात फारसा फरक पडलेला नाही. हा फोटो त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीचा आहे. यावेळी त्यांनी साडी नेसली होती. तर, शिरीष गुप्ते यांनी ब्लेझर, शर्ट आणि टाय असा गेटअप केला होता.
काय आहे वंदना गुप्ते यांची पोस्ट?
"आज आमच्या लग्नाचा 51 वा वाढदिवस आहे. इतकी वर्ष आम्ही एकत्र घालवली यावर माझा विश्वासच बसत नाही. माझ्या मनोरंजन विश्वातील कारकिर्दीला 52 वर्ष पूर्ण झाली. या संपूर्ण कारकिर्दीत शिरीषने मला कायम पाठिंबा दिला. तो कायम माझ्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिला. एक गृहिणी म्हणून घर सांभाळणं आणि अभिनेत्री म्हणून अभिनय करणं यात माझी खूप तारेवरची कसरत व्हायची. पण, या सगळ्याच गोष्टींसाठी शिरीष तुझे खूप आभार, अशी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.
दरम्यान, वंदना गुप्ते आणि शिरीष यांचं लव्ह मॅरेज आहे. अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी त्यांच्या लग्नातील अनेक किस्से शेअर केले आहेत.