Join us

मराठमोळ्या या अभिनेत्रीचा नवरा आणि सासरे आहेत देशसेवेसाठी तत्पर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 12:11 PM

या अभिनेत्रीने सोशल मीडियावर नवरा आणि सासऱ्याचे फोटो शेअर केले आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री क्रांती रेडकर हिने आतापर्यंत अनेक सिनेमातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे. आजही कोंबडी पळाली तंगडी धरून हे कानावर पडलं की क्रांतीचा चेहरा डोळ्यासमोर तरळू लागतो. क्रांती आता सिनेइंडस्ट्रीत तितकीशी सक्रीय नाही. मात्र ती सोशल मीडियावर एक्टिव्ह असून तिथून चाहत्यांसोबत संपर्कात असते. तसेच ती फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. नुकतेच तिने नवरा आणि सासऱ्याचे फोटो शेअर करत  सासरे देखील पोलीस असल्याचे सांगून देशभक्तीचा अंगभूत असलेला गुण समीरमध्येही रुजला गेला असल्याचे तिने म्हटले आहे.

क्रांती रेडकर हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर नवरा आणि सासऱ्यांचा फोटो शेअर केला आहे आणि लिहिले की, सासरेदेखील पोलीस असून देशभक्तीचा गुण त्यांच्याकडून समीरमध्ये रुजला गेला आहे. 

क्रांती रेडकरने मार्च २०१७मध्ये आयपीएस अधिकारी समीर वानखेडेसोबत लग्न केले. डिसेंबर २०१८ मध्ये तिने जुळ्या मुलींना जन्म दिला. क्रांतीने नेमके कोणासोबत लग्न केले याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणामुळे समीर वानखेडे क्रांतीचे पती आहेत हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

मुंबईतील सर्वात कडक अधिकारी म्हणून समीर वानखडे यांना ओळखले जाते.२०१३ मध्ये बॉलिवूड सिंगर मिका सिंग याला मुंबई एअरपोर्टवर कस्टम अधिका-यांनी परदेशी चलनासह पकडले तेव्हा समीर वानखेडे यांनीच त्यांच्यावर कारवाई केली होती.

समीर २००४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहे. त्यांची पहिली पोस्टिंग मुंबई एअरपोर्टवर कस्टम अधिकारी म्हणून झाली होती. ते आंध्र प्रदेश आणि दिल्लीमध्येही सेवेत होते. समीर वानखेडेंच्या नेतृत्वाखील दोन वर्षात सुमारे १७ हजार कोटींचे ड्रग्ज पकडले गेले आहेत. नुकतेच समीर वानखेडे यांची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

क्रांतीने मराठीसोबतच ‘गंगाजल’ या हिंदी चित्रपटातही काम केले आहे. या चित्रपटात तिने अपूर्वा कुमारीची भूमिका निभावली होती. जत्रा सिनेमातील ‘कोंबडी पळाली’ या गाण्यामुळे क्रांतीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिने आॅन ड्युटी 24 तास, माझा नवरा तुझी बायको, नो एन्ट्री पुढे धोका आहे यांसारख्या सिनेमात अभिनयाची जादू दाखवली होती.

टॅग्स :क्रांती रेडकर