Ashi Hi Jamva Jamvi Teaser: ‘राजकमल एंटरटेनमेंट’ प्रस्तुत आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित 'अशी ही जमवा जमवी' (Ashi Hi Jamva Jamvi) हा एक नवीकोरी कथा असलेला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf ) आणि वंदना गुप्ते (Vandana Gupte)यांची चित्रपटात मुख्य भूमिका आहे. नुकताच 'अशी ही जमवा जमवी' चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांचं लक्ष चित्रपटाने वेधून घेतलं आहे.
नुकताच सोशल मीडियावर या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. "तीन पिढ्यांच्या खट्याळ गोष्टीचा गोंडस, मजेदार TEASER आलाय तुमच्या भेटीला. “अशी ही जमवा जमवी”. १० एप्रिल २०२५ पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात!" अशी पोस्ट शेअर करण्यात आली आहे.
दरम्यान, 'अशी ही जमवा जमवी' या चित्रपटातून प्रेक्षकांना दोन दिग्गजांची पडद्यावर होणारी मजेदार जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. शिवाय विनोदाची अचूक पेरणी करत हलक्या फुलक्या पद्धतीने या चित्रपटातून मांडण्यात येणार आहे. अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपटाबद्दल आता रसिकांच्या मनात देखील उत्सुकता निर्माण झाली आहे. खट्याळ, गोंडस, मजेदार, हळवी गोष्ट असलेला “अशी ही जमवा जमवी” सिनेमात अशोक सराफ, वंदना गुप्ते यांच्यासह सुनील बर्वे तसेच सुलेखा तलवळकर, चैत्राली गुप्ते, तनिष्का विशे यांसारखी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.