Join us

"पोलिसांनी मला तेजश्री प्रधानबद्दल विचारलं तेव्हा...", भूषण प्रधानने सांगितला 'तो' किस्सा; काय घडलेलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 15:49 IST

भूषण प्रधान हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे.

Bhushan Pradhan: भूषण प्रधान (Bhushan Pradhan) हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. वेगवेगळ्या मराठी मालिका तसंच चित्रपटांतून त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. भूषण प्रधान त्याच्या कामाबरोबरच  वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतो. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्याने त्याच्या आठवणीतील एक मजेदार किस्सा शेअर केला आहे. 

अलिकडेच भूषण प्रधानने 'कलाकृती मीडिया'सोबत संवाद साधला. या मुलाखतीमध्ये अभिनेत्याला कधी सिग्नल तोडलाय का? असा प्रश्न विचारण्यात आला त्याबद्दल सांगताना अभिनेता म्हणाला,"हो, आजकाल मी सिग्नल कमी तोडतो. अगदीच नाही असं होत नाही. पण, मला नियम पाळायला आवडतं. एकदा मी यापूर्वी राहायचो तिथे एक सिग्नल तोडला होता आणि त्याच्या काही दिवस आधी तेजश्री प्रधानने तिथे सिग्नल तोडला होता. तेव्हा पोलिसांनी आम्हाला पकडलं होतं. तेव्हा त्यांनी माझ्या आयडीवर नाव पाहिलं भूषण प्रधान आणि  मला विचारलं की, तेजश्री प्रधान तुमची बहिण आहे का? तिने पण सिग्नल तोडला तुम्ही दोघेही भाऊ-बहिण तसेच आहात."

पुढे भूषणने सांगितलं, "त्यानंतर मी त्यांना सांगितलं की आम्ही भाऊ-बहिण अजिबात नाही. मग मी तेजश्रीला कॉल केला आणि तिला विचारलं की तू सिग्नल तोडला होता का? कारण मला सुद्धा तुला पकडलं त्याच ठिकाणी पोलिसाने पकडलं होतं. मी सुद्धा सिग्नल तोडला. पण, सिग्नल तोडल्यानंतर फाईन भरायला मला काहीच वेगळं वाटत नाही. ही माझी चूक आहे आणि फाईन भरणं मी गरजेचं समजतो." असं अभिनेत्याने सांगितलं. 

वर्कफ्रंट

भूषण प्रधानच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याने 'टाइमपास','घरत गणपती','कॉफी आणि बरंच काही','आम्ही दोघी' अशा चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अलिकडेच अभिनेता 'जुनं फर्निचर', 'घरत गणपती', 'ऊन सावली' या चित्रपटांमध्ये पाहायला मिळाला.

टॅग्स :भुषण प्रधानतेजश्री प्रधान मराठी अभिनेतासेलिब्रिटी