Vaidehi Parshurami: अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) दिग्दर्शित 'संगीत मानापमान' हा सिनेमा १० जानेवारी २०२५ ला सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाची मराठी मनोरंजनविश्वात जोरदार चर्चा झाली. 'संगीत मानापमान' या ११३ वर्ष जुनं नाटक रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळालं. या चित्रपटात अभिनेता सुबोध भावेसह, वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami) , सुमीत राघवन, निवेदिता सराफ, नीना कुलकर्णी, उपेंद्र लिमये, शैलेश दातार आणि अर्चना निपाणकर यांची सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. शौर्य, धैर्य, प्रेम, मान, अपमानाची कथा सिनेमामध्ये पाहायला मिळत आहे. दरम्यान, अशातच अभिनेत्री वैदेही परशुरामीनेसोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
'संगीत मानापमान'मधील काही लढाईच्या सीन्ससाठी अभिनेत्रीने कशा प्रकारे तयारी केली याचा हा व्हिडीओ आहे. 'संगीत मानापमान' या चित्रपटातील सगळ्यात अवघड पण सगळ्यात अधिक भावलेला भाग…, खूप लोकांचे आभार! सर्वप्रथम आमचे P K Master आणि त्यांची संपूर्ण टीम! आणि चित्रपटाची संपूर्ण टीम! अशा आशयाची पोस्ट तिने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. दरम्यान, वैदेहीने संगीत मानापमानच्या क्लायमॅक्स सीन्ससाठी अभिनेत्रीने तलवारबाजी आणि लाठीकाठी शिकण्यासाठी फार मेहनत घेतल्याची पाहायला मिळतेय. सोशल मीडियावर अभिनेत्रीचे चाहत्यांनी तिच्या कामाचं आणि डेडिकेशनचं कौतुक करत लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
'संगीत मानापमान' हा सिनेमा चांगलाच चर्चेत आला होता. 'कट्यार काळजात घुसली' या सांगितीक सिनेमानंतर सुबोध भावेने अतिशय उत्तमरित्या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली. भामिनी, धैर्यधर आणि चंद्रविलास यांच्यातील प्रेम, इर्ष्या, मान, आणि अपमानाची ही सांगितिक कथा खिळवून ठेवणारी आहे. ज्योती देशपांडे आणि सुनील फडतरे यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे.