तुटपुंजे बजेट हे मराठी सिनेमांसाठी मोठे दुखणे ठरत होते. आकर्षक लोकेशन्स, बिग बजेट यांचा मराठी सिनेमांशी फार अभावानेच संबंध दिसून येत असे. मात्र, आता काळ बदललाय आणि मराठी सिनेमांमध्ये दिसणारी लोकेशन्ससुद्धा बदललीत. कधी काळी ग्रामीण भागासह मुंबई आणि पुण्यात शूट होणारे मराठी सिनेमा, आता परदेशातील आकर्षक लोकेशन्सवर शूट होऊ लागलेत. बजेट वाढल्याने मराठी सिनेमांमध्ये आता कधीही न पाहिलेली परदेशातली ठिकाणे दिसू लागलीत. परदेशातील निळाशार सागरीकिनारा मराठी सिनेमात पाहायला मिळाला तर... ही कल्पनाच रसिकांसाठी सुखावणारी होती. मात्र, कल्पना रसिकांसाठी प्रत्यक्षात अवतरली, ती ‘इश्कवाला लव्ह’ या सिनेमातून. आदिनाथ कोठारे आणि सुलगना पाणीग्रही यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचे शूटिंग मॉरिशसच्या नयनरम्य अशा सागरी किनाऱ्यावर करण्यात आले होते. ’ सुविधा आणि तंत्रज्ञानाच्या अभावामुळेही काही दिग्दर्शकांनी मराठी सिनेमाचे चित्रीकरण परदेशात करण्याचा निर्णय घेतला. ‘यलो’ या सिनेमातून महेश लिमये यांची दिग्दर्शक म्हणून कारकिर्द सुरू झाली. या सिनेमात लिमये यांना एक अंडरवॉटर सीन चित्रित करायचा होता. अंडरवॉटर सीनसाठी लागणारे तंत्रज्ञान आणि सुविधा भारतात नसल्याने लिमये यांनी बँकॉकची वाट धरली. यलो सिनेमातील हा सीन बँकॉक विद्यापीठामध्ये चित्रित करण्यात आला होता. ’ बँकॉकमध्ये चित्रित करण्यात आलेला आणखी एक मराठी सिनेमा म्हणजे ‘बाबुरावला पकडा’. सिनेमाच्या कथानकाची गरज म्हणून या सिनेमाचे चित्रीकरण बँकॉकमध्ये करण्यात आले होते. विशेष म्हणजे, सलमान खानच्या ‘रेडी’ सिनेमाचे चित्रीकरण ज्या बंगल्यात झाले, त्याच बंगल्यात ‘बाबुरावला पकडा’ या सिनेमाचे चित्रीकरण करण्यात आले होते. ’ काही महिन्यांपूर्वी ‘चिटर’ हा सिनेमा रूपेरी पडद्यावर झळकला. या सिनेमातील काही दृष्यांचे चित्रीकरणसुद्धा मॉरिशसच्या सुंदर आणि नयनरम्य किनाऱ्यावर करण्यात आले होते. याशिवाय, ‘क्लासमेट्स’, ‘उलाढाल’, ‘मुक्काम पोस्ट लंडन’ या सिनेमांच्या निर्मात्यांनाही परदेशी लोकेशन्सची भुरळ पडली. ’दर्जेदार कथा आणि आशयघन विषय यामुळे मराठी सिनेमा नव्या उंची गाठत होता. ग्रामीण भागातील लोकेशन्ससोबत आता परदेशातील आकर्षक आणि तितकेच प्रेमात पाडणाऱ्या सुंदर अशा लोकेशन्सवर मराठी सिनेमांचे चित्रीकरण होऊ लागलेय. त्यामुळे मराठी सिनेमा रसिकांसाठी ही नक्कीच सुखावणारी गोष्ट म्हणावी लागेल.’ रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर रेकॉर्र्ड बे्रक कमाई करीत नवा उच्चांक गाठला. या सिनेमातील काही दृष्यांचे चित्रीकरण दुबईमध्ये करण्यात आले होते.
मराठी सिनेमा परदेशी लोकेशन्सवर
By admin | Published: September 08, 2016 3:42 AM