​मराठी इंडस्ट्रीचे २०१६ झिंगाट वर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2016 12:01 PM2016-12-26T12:01:32+5:302016-12-26T12:01:32+5:30

        प्रियांका लोंढे सैराटमय सुरुवात मराठी फिल्म इंडस्ट्रीत यावर्षी बरेच सिनेमे रिलीज झाले. नवीन वषार्ची दमदार सुरुवात ...

The 2016 Zinta Year of the Marathi Industry | ​मराठी इंडस्ट्रीचे २०१६ झिंगाट वर्ष

​मराठी इंडस्ट्रीचे २०१६ झिंगाट वर्ष

googlenewsNext
        प्रियांका लोंढे


सैराटमय सुरुवात
मराठी फिल्म इंडस्ट्रीत यावर्षी बरेच सिनेमे रिलीज झाले. नवीन वषार्ची दमदार सुरुवात नाना पाटेकर आणि महेश मांजरेकरांच्या नटसम्राट या सिनेमाने झाली. प्रेक्षकांनी या सिनेमाला पसंतीची पावती दिली. परंतू त्यानंतर आलेल्या सैराट या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातच सुवर्णाक्षरांनी आपले नाव कोरले. सैराटने संपूर्ण देशात एकच खळबळ माजविली. संपूर्ण चित्रपटसृष्टीचे लक्ष मराठमोळ््या नागराज मंजूळेच्या सैराटने वेधून घेतले. बॉलिवूडवाल्यांनी देखील सैराटमय होत, या चित्रपटाचा रिमेक हिंदीत करण्याचे मनावर घेतले. करण जोहरने या चित्रपटाचे हक्क विकत घेतले. या वर्षाच्या अखेरीपर्यंत सैराटच्या चर्चा काही थांबल्या नाहीत.   


 मंजूळेंना करावा लागला वादाचा सामना

      सैराट चित्रपट प्रदर्शित होऊन काहीच दिवस झाले होते. नागराज मंजूळे या चित्रपटाचे यश सेलिब्रेट करत नाहीत, तो पर्यंतच त्यांना एका मोठ्या वादळाचा सामना करावा लागला. वाद तसा घरगुतीच होता पण तो चारचौघांसमोर आला. नागराजच्या घटस्फोटीत पत्नीने एका वृत्तापत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, पडत्या काळात कष्ट करून साथ दिली, मात्र ज्यांच्यामुळे यश मिळाले त्यांनाच नागराज मंजुळे यांनी दूर लोटले, असा आरोप करीत मला पत्नी म्हणून पुन्हा नांदवावे, अशी मागणी मंजुळे यांच्या घटस्फोटीत पत्नी सुनीता यांनी केली होती. सुनीता या आठवी पास आहे. मंजुळे कुटुंबासाठी तिने अनेक खस्ता खाल्या. घटस्फोटाचा खटला दाखल झाल्यावर सततच्या तारखांनी ती वैतागून गेली होती. त्यामुळे तिने सह्या करून टाकल्या, असे सुनिताचे वडील हरिश्चंद्र लष्करे यांनी म्हटले होते. मात्र नागराज मंजुळेंच्या वतीने स्पष्टीकरण आल्यानंतर ही चर्चा संपुष्टात आली होती.  


नेहाच्या न्युडसीनची चर्चा  
नेहा महाजन तामिळ सिनेमातील तिच्या एका लीक झालेल्या व्हिडिओमुळे यावर्षी चर्चेत आली होती. ''छायम पोसिया वीडू'' या तामिळ सिनेमासाठी नेहाने न्यूड सीन्स दिले होते. या सीन्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या सिनेमातील एक दोन नव्हे तर तीन व्हिडिओ व्हायरल झाले होते. एका व्हिडिओत नेहा बाथरूममध्ये अंग पुसताना दिसली, दुसºया व्हिडिओत न्यूड वॉक, तर तिसºया व्हिडिओत सेक्स करताना दिसली होती. विशेष म्हणजे हा सिनेमा भारतात बॅन आहे. या सिनेमातील नेहावर चित्रीत झालेले हे तिन्ही सीन्स वगळण्याचे सेन्सॉर बोडार्ने दिग्दर्शकाला सांगितले होते. मात्र दिग्दर्शला सेन्सॉरचे म्हणणे मान्य नसल्याने या सिनेमावर भारतात बंदी घालण्यात आली होती.


बॉलिवूड तारकांचा मराठीत जलवा  
यावर्षी बॉलिवूडच्या दोन आघाडीच्या तारकांनी  मराठी इंडस्ट्रीत पदार्पण केले. यामधील दोन मोठी नावे म्हणजे विद्या बालन आणि प्रियांका चोप्रा. अभिनेत्री विद्या बालन एक अलबेला या मराठी सिनेमात मंगेश देसाईसोबत  दिसली. तसेच अभिनेत्री प्रियांका चोप्राने तर एका मराठी चित्रपटाची निर्मिती करुनच मराठी इंडस्ट्रीत पदार्पण केले.  हेंटिलेटर या सिनेमाची निर्मिती प्रियांकाने केली. एवढेच नाही तर या चित्रपटातील बाबा हे एक हळवे गाणे प्रियांकाने आपल्या मधुन आवाजात गायले होते. 


मराठी चित्रपटांची कानमध्ये मोहोर
 
यावर्षीच्या ६९ व्या कान फिल्म फेस्टिवलसाठी हलाल, वक्रतुंड महाकाय आणि रिंगण या तीन मराठी सिनेमांची निवड झाली होती. हलाल सिनेमाची नायिका प्रीतम कागणे ही कानमध्ये 'हलाल' सिनेमाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी गेली होती. तसेच अभिनेता आदिनाथ कोठारेने देखील कानमध्ये प्रोड्युसर वर्कशॉपसाठी हजेरी लावली होती.


मराठी कार्यक्रमांमध्ये बॉलिवूडकर झाले झिंगाट
    सध्या छोट्या पडद्यावर गाजत असलेला एका शो मध्ये या वर्षी अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. सहसा मराठी कार्यक्रमांमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटी हजेरी लावताना क्वचितच दिसले होते. मात्र यावर्षभरात बॉलिवूडकरांनी मराठी टेलिव्हिजनचा पडदा जवळ केला होता. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानपासून ते जॉन अब्राहम, सोनाक्षी सिन्हा, वरुण धवन, काजोल, अजय देवगण हे बॉलिवूडचे बडे कलाकार आपापल्या सिनेमांच्या प्रमोशनसाठी मराठमोळ््या कार्यक्रमांमध्ये झिंगाटमय झालेले दिसले.


मराठी इंडस्ट्रीत वाजले सनई-चौघडे
यावर्षी मराठी चित्रपटसृष्टीतील एक दोन नव्हे तर तब्बल दहा कलाकार लग्नाच्या बेडीत अडकले. वर्षाच्या सुरुवातीला अभिनेत्री मृणाल दुसानिसच्या लग्नाची गोड बातमी तिच्या चाहत्यांना कळली. तसेच यावर्षी अभिनेत्री स्वरांगी मराठे, मृण्मयी देशपांडे, सिद्धार्थ मेनन, कादंबरी कदम, पर्ण पेठे आणि आलोक राजवाडे, संग्राम समेळ आणि पल्लवी पाटील, संगीतकार शैलेंद्र बर्वे, वजनदार फेम अभिनेता चिराग पाटील, अभिनेत्री श्रुती मराठे आणि गौरव घाटणेकर हे कलाकार लग्नबंधनात अडकले
 



Web Title: The 2016 Zinta Year of the Marathi Industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.