Join us

2017 मध्ये हे सेलिब्रेटी अडकले लग्नगाठीत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 10:30 AM

2017 हे वर्ष तसे बॉलिवूडप्रमाणे मराठी इंडस्ट्रीसाठी खास ठरले. यावर्षी अनेक अभिनेता आणि अभिनेत्री लग्नाच्या बेडीत अडकले आहे. कोणी डेस्टिशन वेडिंगला पसंती दिली तर कुणी साध्य पद्धतीने लग्न केले. एक नजर टाकूया अशाच काही जोड्यांवर

2017 हे वर्ष तसे बॉलिवूडप्रमाणे मराठी इंडस्ट्रीसाठी खास ठरले. यावर्षी अनेक अभिनेता आणि अभिनेत्री लग्नाच्या बेडीत अडकले आहे. कोणी डेस्टिशन वेडिंगला पसंती दिली तर कुणी साध्य पद्धतीने लग्न केले. एक नजर टाकूया अशाच काही जोड्यांवर कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा अशा विविध मराठी सिनेमातून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे याच वर्षी रेशीमगाठीत अडकली आहे. निर्माता अभिषेक जावकरसह तिचं शुभमंगल गोव्यात पार पडलं.दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेमुळे नावारूपाला आलेला अभिनेता अमेय वाघदेखील याच वर्षी लग्नबंधनात अडकला. त्याने त्याची मैत्रीण साजिरी देशपांडेसोबत पुण्यात विवाह केला.अभिनेत्री मनवा नाईकचा निर्माता सुशांत तुंगारेसह धुमधडाक्यात शुभमंगल पार 2017 मध्ये पडला. ‘चूक भूल द्यावी घ्यावी’ या छोट्या पडद्यावरील मालिकेची तिने सुशांत तुंगारेसह निर्मिती केली आहे.शशांक केतकरने 2017 मध्ये पुन्हा एकदा बोहल्यावर चढला. शशांक त्याची मैत्रिण प्रियांका ढवळेसोबत विवाह बंधनात अडकला. शंशाकची पत्नी प्रियांका व्यवसायाने वकील आहे.'रेगे' फेम अभिनेता आरोह वेलणकरने 11 डिसेंबरला अकिंता शिंगवीसह विवाबबंधनात अडकला. विशेष म्हणजे आरोह हा मराठी तर अंकिताही मारवाडी असल्यामुळे अंकिताच्या पारंपारिक पद्धतीनुसार म्हणजेच मारवाडी पद्धतीने या दोघांनी लग्न केले.