Join us

“पुन्हा २६/११” सिनेमाला सतिया अवार्डमध्ये दोन नामांकन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 4:12 AM

कोणत्याही सिनेमावर जोपर्यंत कौतुकाची थाप पडत नाही तोवर त्या सिनेमाच्या दिग्दर्शकाचे आत्मिक समाधान होत नाही. सिनेमा हे मनोरंजाचे माध्यम ...

कोणत्याही सिनेमावर जोपर्यंत कौतुकाची थाप पडत नाही तोवर त्या सिनेमाच्या दिग्दर्शकाचे आत्मिक समाधान होत नाही. सिनेमा हे मनोरंजाचे माध्यम असले तर त्यातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न अनेक दिग्दर्शक करत असतात, पण त्यातही देशाचा विचार करणारे थोडकेच. सुमित पोफळे दिग्दर्शित “पुन्हा २६/११” या मराठी सिनेमाला अलीकडेच दिल्लीच्या सतिया अवार्ड २०१८ (Social Activist & Talented Indian Award) मध्ये सर्वोत्कृष्ट सामाजिक सिनेमा आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अशी दोन नामांकनं मिळाली आहेत. या पुरस्कारात प्रथमच मराठी सिनेमाला नामांकनं मिळाली आहेत.याबाबत दिग्दर्शक सुमित पोफळे सांगतात कि, मुंबई मधील २६/११ आणि पुणे बॉंबस्फोट यावेळी पोलिसांनी केलेली कामगिरी कुठेतरी रुपेरी पडद्यावर यावी या एकमेव इच्छेने मी हा सिनेमा तयार केला आहे. पोलिसांच्या कामगिरी या सिनेमातून सलाम देण्याचा आमचा प्रयत्न आहे. शिवाय सिनेमातील पोलिंसाची भ्रष्ट प्रतिमा कुठेतरी पुसण्याचा आमचा प्रयत्न आहे. या सिनेमातून खऱ्या अर्थाने शहीद पोलिसांना श्रद्धांजली देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमच्या पहिल्याच प्रयत्नाला सतिया अवार्ड २०१८ ने दोन विभागात नामंकानं दिल्यामुळे आमचा उत्साह अधिक वाढला आहे. लवकरच सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.सिनेमात मिताली पोफळे, केतन पेंडसे, नितीन कर्जतकर, संदीप भंडारी, सुनील गोडबोले, सागर बेंद्रे, प्रशांत तपस्वी, गंगाराम कडुलकर, राजू कांबळे, गोपाळ गायकवाड, संगीता एस. डॉ. रतीश देव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. शिवाय आणखी एक हिंदी-मराठी अभिनेते विशेष भूमिकेत असतील, लवकरच त्यांची घोषणा केली जाईल.