Join us

Zapatlela @30: ‘झपाटलेला’ चित्रपटातील लक्ष्याची ऑनस्क्रीन प्रेयसी आता कशी दिसते? पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 11:11 AM

30 Years Of Marathi Movie Zapatlela, Pooja Pawar: ३० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे १६ एप्रिलला ‘झपाटलेला’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. आज या सिनेमाला ३० वर्षे पूर्ण झालीत.... 

30 Years Of Marathi Movie Zapatlela : मराठी चित्रपट सृष्टीतील काही सिनेमे आजही आवडीने पाहिले जातात. हे चित्रपट तुम्ही कधीही आणि कितीही वेळा पाहिले तर तुम्हाला कधीच कंटाळा येणार नाही. १९९३ साली प्रदर्शित झालेला 'झपाटलेला' हा असाच एक सिनेमा. 'झपाटलेला' या महेश कोठारे दिग्दर्शित सिनेमाने सर्वांना वेड लावलं होतं. ३० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे १६ एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. आज या सिनेमाला ३० वर्षे पूर्ण झालीत. 

मराठीतील आयकॉनिक चित्रपट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde), महेश कोठारे (Mahesh Kothare), पूजा पवार (Pooja Pawar) या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या प्रेयसीची भूमिका साकारणारी अभिनेत्री तुम्हाला आठवत असेलच. आम्ही बोलतोय ते अभिनेत्री पूजा पवार यांच्याबद्दल. पूजा पवार यांची या चित्रपटातील भूमिका लक्षवेधी ठरली होती. 

'झपाटलेला' चित्रपटातील पूजा पवार यांचा ऑनस्क्रीन लुक तुम्हाला आठवत असेलच. या चित्रपटात त्या अगदी देसी अंदाजात दिसल्या होत्या. पण रिअल लाईफमध्ये त्या  खूपच ग्लॅमरस आहेस.  

लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांच्या ऑनस्क्रीन जोडीइतकीच पूजा आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली होती. लक्ष्मीकांत बेर्डे आणि पूजा पवार यांची 'झपाटलेला' सिनेमातील जोडीही अशीच तुफान लोकप्रिय झाली होती.झपाटलेला, माझा छकुला, विदूषक, चिकट नवरा, उतावळा नवरा यासारख्या चित्रपटात पूजा पवार यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत काम केलं आहे.

कोल्हापूर येथे जन्मलेल्या पूजा पवार यांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी अभिनेते अजिंक्य देव सोबत सर्जा  या सिनेमात काम केलं. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. टोपीवर टोपी, एक होता विदूषक, विश्वविनायक, धोंडी यासारखे दमदार चित्रपट त्यांनी साकारले. मध्यंतरी या अभिनयसृष्टीपासून त्या थोड्या दूर गेल्या खऱ्या परंतु धोंडी चित्रपटातून त्यांनी पुन्हा कमबॅक केलं. झी युवा वरील बापमाणुस मालिकेतील त्यांच्या भूमिकेलाही रसिकांकडून चांगलीच दाद मिळाली.

सचिन पिळगावकर दिग्दर्शित अशी ही आशिकी चित्रपटात त्यांनी लक्ष्याचा मुलगा अभिनय बेर्डेसोबतही काम केलं. पूजा पवार-साळुंखे यांना नताशा आणि अलिशा या दोन मुली आहेत. त्यांची थोरली मुलगी अलिशाने देखील आईच्या पाऊलावर पाऊल टाकत अभिनय तसेच मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केलं आहे. “Mia- तनिष्क” , गिट्स, सुपरसॉनिक यासारख्या व्यावसायिक जाहिरातीत ती झळकली आहे.     

टॅग्स :लक्ष्मीकांत बेर्डेमराठी अभिनेतामराठी चित्रपट