मुंबईच्या गोरगाव येथील नेस्को ग्राऊंडमध्ये दिमाखदार ४ थ्या जिओ फिल्मफेअर अवार्ड्स मराठी २०१८’ सोहळ्यास सुरूवात झाली आहे. तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या पुरस्कार सोहळ्याचे हे चौथे पर्व आहे. यादरम्यान सोहळ्याच्या रेडकार्पेटवर मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींचा जलवा दिसून आला.
अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने अशा स्टाईलिश अंदाजात सोहळ्याला हजेरी लावली.
मृण्मयी देशपांडे हिचा ग्लॅमरस अवतार यावेळी दिसला.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी नामांकन मिळवणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने रेड कार्पेटवर अशी स्टाईलिश एन्ट्री घेतली.
अमृता खानविलकर काळ्या रंगाच्या स्टाईलिश आऊटफिटमध्ये दिसली.
किशोरी शहाणे यांनीही सोहळ्याला हजेरी लावली.
अभिनेत्री सई ताम्हणकर हिने रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली आणि सगळ्या नजरा तिच्यावर खिळल्या.‘४ थ्या जिओ फिल्मफेअर अवार्ड्स मराठी २०१८’मध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना, चित्रपटांना गौरविले जाणार आहे. आजच्या सोहळ्यात मानाची ब्लॅकलेडी कोण पटकावतं, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.यंदाच्या पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या श्रेणीत मृण्मयी गोडबोले (चि वा चि सौ कां), मुक्ता बर्वे (हृदयांतर), पूजा सावंत (लपाछपी), प्रिया बापट (गच्ची), सोनाली कुलकर्णी (ज्युनिअर) (हंपी), सोनाली कुलकर्णी (कच्चा लिंबू) यांना नामांकने मिळाली आहेत. सर्वोत्कृष्ट चित्रपटांसाठी हृदयांतर, फास्टर फेणे, लपाछपी, कच्चा लिंबू, मुरांबा, ती सध्या काय करते या चित्रपटांना नामांकने मिळाली आहेत.सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांच्या श्रेणीत अमेय वाघ (मुरांबा), अशोक सराफ (शेंटिमेंटल), सचिन खेडेकर (बापजन्म), सुबोध भावे (हृदयांतर), सुमेध मुदगलकर (मांजा) यांना नामांकने मिळाली आहे.