नाटककार मधु राय यांच्या गुजराती नाटकावर आधारित ‘हा शेखर खोसला कोण आहे?’ या मराठी नाटकाचा लवकरच ५१ वा प्रयोग होणार आहे. २५ डिसेंबर २०१५ रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग करण्यात आला होता. प्रेक्षकांनी या नाटकाला भरभरुन प्रतिसाद दिला हे ५१व्या प्रयोगावरुन आपल्याला दिसून येतच असेल.
एक वेगळा प्रयोग व्यावसायिक रंगभूमीवर करुन पाहावा ही भद्रकाली प्रॉडक्शनच्या जिद्दीने यश मिळवलं. प्रसाद कांबळी यांनी ‘हा शेखर खोसला कोण आहे?’ हे नाटक सादर करुन ससपेन्स थ्रिलर पठडीतलं नाटक प्रेक्षकांना देऊन त्यांचं मनोरंजन केलं. विजय केंकरे दिग्दर्शित ‘हा शेखर खोसला कोण आहे?’ या नाटकातील मधुरा वेलणकर, शर्वरी लोहकरे, लोकेश गुप्ते, तुषार दळवी, विवेक गोरे, सुशील इनामदार या कलाकारांनी अप्रतिम अभिनय करुन रसिक प्रेक्षकांचे मन जिंकले.