Join us

पुण्याचा जावई व्हायला आवडेल का? चाहत्याच्या प्रश्नाला आदेश बांदेकरांच्या मुलाचं दिलखुलास उत्तर, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 14:12 IST

आदेश व सुचित्रा यांचा लेक सोहम बांदेकरही अभिनेता आहे.

आदेश बांदेकर व सुचित्रा बांदेकर हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय कपल आहेत. सिनेसृष्टीतील आदर्श जोडी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आदेश व सुचित्रा यांचा लेक सोहम बांदेकरही अभिनेता आहे. मालिकांमध्ये काम करुन तो घराघरात पोहोचला. सोहम सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. सध्या त्यानं सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. 

नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर 'आस्क मी सेशन' घेतलं. यावेळी सोहमच्या चाहत्यांनी त्याला काही प्रश्न विचारले. या सगळ्या प्रश्नांवर त्याने दिलखुलास उत्तर दिली आहेत. यावेळी एका नेटकऱ्यानं सोहमला 'पुण्याचा जावई व्हायला आवडेल का?' असा प्रश्न विचारला. यावर सोहमने उत्तर देत म्हटलं 'एवढं पुण्य नाही केलंय मी'. यासोबतच त्याने चाहत्यांच्या इतर प्रश्नांचीही उत्तरे दिली. 

दरम्यान सोहमही एक उत्तम अभिनेता आहे. सोहमने आपल्या आई-बाबांच्या पावलावर पाऊल टाकत कलाविश्वात पदार्पण केलं. 'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'नवे लक्ष्य' या मालिकेतून तो छोट्या पडद्यावर झळकला. त्याबरोबरच सोहमने 'बाईपण भारी देवा' या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे.  अभिनयाबरोबर सोहमने निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवलं आहे. सध्या तो ठरलं तर मग या मालिकेची निर्मिती करत आहे.

टॅग्स :आदेश बांदेकरमराठी अभिनेताटिव्ही कलाकार