'आई कुठे काय करते' मधील अनिरुद्धने अशोक सराफ यांच्यासाठी लिहिली खास पोस्ट, म्हणाले- पहिला धडा मिळाला तो...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 05:23 PM2022-06-04T17:23:40+5:302022-06-04T17:42:06+5:30
Aai Kuthe Kay Karte: अभिनेता मिलिंद गवळी ही भूमिका साकारत असून अनेकदा ते सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
छोट्या पडद्यावर गाजत असलेली लोकप्रिय मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते' (aai kuthe lay karte) . उत्तम कथानकामुळे लोकप्रिय ठरत असलेल्या या मालिकेतील काही भूमिकाही सोशल मीडियावर चांगल्याच गाजत आहेत. त्यातलीच एक भूमिका म्हणजे अनिरुद्ध. अभिनेता मिलिंद गवळी ही भूमिका साकारत असून अनेकदा ते सोशल मीडियावर या भूमिकेविषयी आणि मालिकेतील इतर कलाकारांविषयी त्यांची मतं मांडत असतात. यावेळी मिलिंद गवळी यांनी अशोक सराफ यांच्यासाठी खास पोस्ट लिहिलेली आहे. जी सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
मिलिंद गवळी यांनी अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. अशोक मामा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा” अशोक मामांन बरोबर चा माझा पहिला सिनेमा "सुन लाडकी सासरची" ज्याच्या मध्ये मला त्यांच्या मुलाची भूमिका करायला मिळालली. या Legendary Actor बरोबर काम करायचं भाग्य मला मिळालं , आणि पहिला धडा मिळाला तो म्हणजे “ मिशा “ कशाला लावायच्या असतात, खूप कमी अभिनेत्यांना खोट्या मिशा लावनं जमतच नाही , खूप विचित्र पद्धतीने ते लावतात आणि पडद्यावर त्या खोट्या आहेत हे दिसून येतं, अशोक मामा सकाळी , भरपूर गम लावून , एकदा का त्यांनी मिशी चिटकवली कि ती रात्री packup पर्यंत , हलत सुद्धा नाही , मी खूप नशीबवान आहे मला त्यांच्याबरोबर, बरेच सिनेमे करायला मिळाले “सख्खा भाऊ पक्का वैरी “, "भक्ती हीच खरी शक्ती" , "मोस्ट वॉंटेड" ,"मस्त कलंदर ", अजून दोन सिनेमे जे पूर्ण झाले नाहीत.
पुढे ते म्हणतात, ''प्रत्येक सिनेमांमध्ये त्यांच्याकडून काहीना काहीतरी नवीन शिकायला मिळायचं, आमचा तुफान चाललेला चित्रपट म्हणजे सातारच्या अण्णा देशपांडे यांचा चित्रपट “सख्खा भाऊ पक्का वैरी “पश्चिम महाराष्ट्रातला एकही घर असं नाहीये ज्यांना “सख्खा भाऊ पक्का वैरी “ हा चित्रपट माहित नाही किंवा त्यांनी पाहिलेला नाही, या चित्रपटानंतर माझ्याकडे असंख्य ग्रामिण मराठी सिनेमे चालून आले, अशोक मामान सारख्या दिग्गज कलावंता बरोबर काम केल्यामुळे मी ही लोकप्रिय झालो , ती एक म्हण आहेना “गाड्याबरोबर नळाची यात्रा “ तसं माझ्या बाबतीत झालं , माझ्या चित्रपटातलं यश हेच आहे की , मला अशोक मामान सारख्या प्रतिभावान कलाकारांबरोबर काम करायचं भाग्य मिळालं . आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि परमेश्वराकडे प्रार्थना करतो त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांच्या सगळ्या मनोकामना पुर्ण होऊ देत आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभो.'' अशी पोस्ट मिलिंद गवळी यांनी लिहिली आहे.