Join us

'आईच्या हातचं' आता घराघरात, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2020 10:58 AM

'आईच्या हातचं' या सीरिजला प्रेक्षकांची मिळतेय चांगली पसंती

भारतीय टुरिंग पार्टी अर्थात भाटूपा या युट्युब चॅनेलवर 'आईच्या हातचं' ही नवीन वेबसिरीज दाखल झाली असून ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. यात मराठी सेलिब्रिटीज त्यांच्या आईसोबत त्यांचा सर्वात आवडता पदार्थ एकत्र बनवतात आणि गप्पागोष्टीमधून लहानपणीच्या आठवणींना उजाळा देताना दिसून येतात.

या वेबसीरिजचे तीन एपिसोडस/भाग युट्युबवर प्रक्षेपित झाले असून या सिरीजद्वारे कलाकारांचे त्यांच्या आईशी असलेले अतूट नाते,आठवणी खाण्याच्या मार्फत दर्शविल्या आहेत. यामध्ये कलाकार आपल्या घरी जाऊन आईला त्यांचे आवडते पदार्थ करायला सांगतात आणि आपल्या आयुष्यातील काही पैलू ,काही किस्से यादरम्यान ते प्रेक्षकांना सांगतात. 

आईच्या हातचंच्या पहिल्या भागात चि व चिसौकामधील अभिनेत्री मृण्मयी गोडबोले आई गीता गोडबोले यांना मदत करत मुद्दा भाजी आणि मिरचीची भजी हे दोन पदार्थ करायला सांगते आणि ते तयार झाल्यावर त्यांचा मनापासून आस्वादही घेते.

दुसऱ्या भागात भाडिपाचाच सहसंस्थापक सारंग साठये आपल्या घरी जावून आईशी गप्पा मारत काही जुन्या आठवणींना उजाळा देतो. आई सुजाता साठये यांना आपल्या आवडीची कारल्याची भाजी आणि नारळाची बर्फी करायला सांगतो आणि कृती मध्ये त्यांना मदतही करतो.

तिसऱ्या भागात भाटूपासाठी बजेट बॅकपॅकिंग चे व्हिडिओ करणारा आणि देशभर हिंडून नवीन खाद्यसंस्कृती चाखणारा इंद्रजीतने आई स्मिता मोरे यांच्या हातचं खान्देशी वांग्याचं भरीत आणि उपवासाचे लाडू यावर ताव मारतो.भारतीय डिजिटल पार्टी (भाडिपा) हे मराठी युट्युब चॅनेल गेल्या ३-४ वर्षांपासून जवळपास साडेसहा लाख सबस्क्रायबर्सचे नवनवीन कलाकृती, संकल्पना आणि वेबसिरीजद्वारे मनोरंजन करत आहे. भाडिपाने राजकीय,सामाजिक,वैज्ञानिक विषयांवरील माहितीसाठी विषय खोल आणि भटकंती, संस्कृती आणि पाककला या विषयांवरील मनोरंजनासाठी भारतीय टुरिंग पार्टी अर्थात भाटूपा अशा आणखी दोन नवीन चॅनेल्सची निर्मिती केली आहे. भाडिपा,भाटूपा आणि विषय खोल हे चॅनेल्स नवनविन संकल्पना घेऊन आपल्यासमोर येणार आहेत.

टॅग्स :पाककृती