Join us

आमीरसोबत चित्रपटात दिसणार 'हा' मराठमोळ्या चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2016 12:15 PM

 आमीर खान सोबत काम करण्यासाठी बॉलिवूडच काय तर अनेक अभिनेत्री लाईनमध्ये उभ्या आहेत. बॉलिवूडच्या या मिस्टर. परफेक्शनिस्ट सोबत आपण ...

 आमीर खान सोबत काम करण्यासाठी बॉलिवूडच काय तर अनेक अभिनेत्री लाईनमध्ये उभ्या आहेत. बॉलिवूडच्या या मिस्टर. परफेक्शनिस्ट सोबत आपण एकदातरी स्क्रीन शेअर करावी असे प्रत्येक अभिनेत्रीलाच वाटते. आता हेच पाहा ना आपली मराठीमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूरचे नशीब सध्या जोरावर असल्याचेच दिसून येत आहे. कारणही तसेच आहे म्हणा, मृणालची आमीरच्या आगामी ठग्स आॅफ हिंदूस्तान या चित्रपटात वर्णी लागल्याचे समजतेय. बरं एवढेच नाही तर या चित्रपटात दस्तुरखुद्द बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन देखील असणार आहेत. आमीर आणि अमिताभजींना मोठ्या पडदयावर एकत्र पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. आता या चित्रपटाच्या निमित्ताने हे दोघेही एकत्र येत आहेत. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोडून टेलिव्हिजनवरील अभिनेत्रीची या चित्रपटासाठी निवड करण्यात आल्याचे कळते. कुमकुम भाग्य या मालिकेने प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री मृणाल ठाकूर आता प्रेक्षकांना आमिरसोबत काम करताना पाहायला मिळणार असल्याचे कळतेय. मृणालने यशस्वी स्क्रिन टेस्ट दिल्याने तिची निवड करण्यात आल्याचे देखील बोलले जात आहे.मृणालने याआधी सुराज्य आणि विटी दांडू या मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच, तिने कुमकुम भाग्य, मुझसे कुछ केहती.. ये खामोशिया यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. खरंतर आमीरला या चित्रपटासाठी अभिनेत्री आलिया भटला घेण्याची फार इच्छा होती. तर आदित्य चोप्राला वाणी कपूरच या भूमिकेसाठी परफेक्ट वाटत होती. अभिनेत्रींच्या निवडीवरून आमीर आणि आदित्यमध्ये वाद झाल्याचे देखील समजत आहे. परंतू आलिया सध्या अनेक चित्रपटांच्या चित्रीकरणांमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे आता आपल्या मराठमोळ््या अभिनेत्रीची आमीर सोबत जोडी जमणार आहे.