Join us

​अवधूत गुप्तेला वाटतोय आर्याचा अभिमान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2017 12:50 PM

गायक, संगीतकार, दिग्दर्शक, परिक्षक अशी कितीतरी बिरुदे मिरविणाºया अवधूत गुप्तेला गायिका आर्या आंबेकरचा अभिमान वाटतोय. असे नुकतेच अवधूतने सोशाल ...

गायक, संगीतकार, दिग्दर्शक, परिक्षक अशी कितीतरी बिरुदे मिरविणाºया अवधूत गुप्तेला गायिका आर्या आंबेकरचा अभिमान वाटतोय. असे नुकतेच अवधूतने सोशाल साईट्सवर सांगितले आहे. आर्या ही सारेगमप या कार्यक्रमातून सर्वांसमोर आली. या कार्यक्रमामध्ये अवधूत परिक्षकाच्या भूमिकेत होता. त्यामुळे आर्याचा गायिका ते अभिनेत्री हा प्रवास अवधूतने अगदी जवळून पाहीला आहे. आता आर्या मराठी चित्रपटसृष्टीत एक अभिनेत्री म्हणुन पदार्पण करीत असल्याने अवधूतला तिचा फारच अभिमान वाटत आहे. आर्यासोबतचा एक झक्कास फोटो सोशलसाईट्सवर शेअर करीत अवधूत म्हणतोय, ती सध्या अ‍ॅक्टींग करतेय, आर्या तुझा आम्हाला अभिमान आहे. असे सांगत त्याने चित्रपटाची देखील तारीफ केली आहे. ती सध्या काय करते हा सिनेमा मस्ट वॉच असे त्याने सांगितले आहे. तर अवधूतचे हे प्रम पाहून आर्या त्याला म्हणते, थँक्यु सो मच अवधूत दादा. तुझा हा मेसेज वाचून फारच आनंद झाला. ाता आपल्या गुरुनी जर अशी सर्वांसमोर तारीफ केली म्हंटल्यावर आर्याला आनंद तर होणारच ना. नुकताच या चित्रपटाचा प्रिमिअर शो मुंबईत पार पडला. या शोला मराठी चित्रपसृष्टीतील अनेक सिताº़यांनी हजेरी लावली होती.  या चित्रपटातील ह्दयात वाजे समथिंग हे गाणे प्रेक्षकांच्या अधिक पसंतीस उतरताना दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. या गाण्याची सोशलमीडियावरदेखील धूम असल्याची दिसत आहे. तसेच या चित्रपटात एकूण चार गाणी आहेत. ही गाणी  निलेश मोहरीर, अविनाश - विश्वजित आणि मंदार आपटे यांनी संगीतबद्ध केली आहेत. यामध्ये जरा जरा आणि परिकथेच्या पºया ही गाणी अश्विनी शेंडे यांनी शब्दबद्ध केली असून ती आर्या आंबेकर आणि हृषीकेश रानडे यांनी गायली आहेत. हृदयात वाजे समथिंग हे गाणं विश्वजित जोशी आणि श्रीरंग गोडबोले यांनी लिहिलंय आहे. तर या गाण्याला हृदित पाटणकर, रोहित राऊत आणि आर्या आंबेकर यांनी आपल्या सुरेख आवाजाने प्रेक्षकांचे मन