Join us

अभिजीत खांडकेकर 'या' गोष्टी करणे वाटते चॅलेंजिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 6:30 AM

अभिनेता स्वप्नील जोशीची मुख्य भूमिकेत असलेला 'मी पण सचिन' नावाचा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झालाय.

ठळक मुद्देसिनेमा आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे

नुकताच अभिनेता स्वप्नील जोशीची मुख्य भूमिकेत असलेला 'मी पण सचिन' नावाचा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झालाय. या सिनेमात नायकाबरोबर विशेष लक्षात राहिला आहे तो म्हणजे या चित्रपटातील खलनायक. तर हा खलनायक दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे अभिनेता अभिजीत खांडकेकर.अभिजीत खांडकेकर  झी मराठी वरील माझ्या नवऱ्याची बायको या सुपर हिट मालिकेतून घराघरात पोहोलेला. मी पण सचिनमधली त्याची खलनायकाची भूमिका त्याचा आवेश या सगळ्यांना प्रेक्षकांबरोबरच चित्रपट समीक्षकांनी सुद्धा दाद दिलीय. 

अभिजीतने अनेक मराठी सिनेमा आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे . एक उत्तम कलाकार आणि आजपर्यत नायकाच्या भूमिकेत दिसलेला अभिजीतने खलनायकही तेवढ्याच ताकदीने वठवला. यात महत्वाचं असं की या क्षणाला छोट्या पडद्यावर तो नायकाच्या भूमिकेत दिसत असून मोठ्या पडद्यावर तो खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे आणि दोन्ही भूमिका प्रेक्षकांना आवडल्या आहेत.

नायक आणि खलनायक एकाचवेळी रागवण्याबद्दल अभिजीत ला विचारले असता अभिजीत म्हणाला, 'एकाच वेळी नायक आणि खलनायक किंबहुना या दोन्हीमधली मधली काहीतरी वेगळी छटा मला रंगवायला मिळत आहे. त्यामुळे कलाकार म्हणून मला नेहमी वाटतं जे माझ्या वाट्याला काम येईल त्याला मी पूर्णपणे न्याय दिला पाहिजे. सध्या मी नायक आणि खलनायक या दोन्ही रंगवणं चॅलेंजिंग वाटतं. आणि भविष्यात अजून अशी चॅलेंजेस मिळावी ही आशा करत होतो'   

टॅग्स :अभिजीत खांडकेकरझी मराठी