Join us

‘‘अ.ब.क.’’ महाराष्ट्रभर हाऊसफुल!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2018 9:14 AM

तो आला, त्याने पाहिलं, आणि तो जिंकला! ही गोष्ट आहे बहुचर्चित चित्रपट अ.ब.क. ची रसिकांची उत्सुकता शिगेला पोहचलेला हा ...

तो आला, त्याने पाहिलं, आणि तो जिंकला! ही गोष्ट आहे बहुचर्चित चित्रपट अ.ब.क. ची रसिकांची उत्सुकता शिगेला पोहचलेला हा चित्रपट आज दिमाखदार पद्धतीने चित्रपट गृहात दाखल झाला आणि प्रेक्षकांच्या मनात घर करून बॉक्स ऑफिसवर दमदार एन्ट्री घेतली. अ.ब.क. ने फर्स्ट डे फर्स्ट शो धुमधडाक्यात साजरा केला. एखाद्या बॉलीवूडपटास ओपनिंग मिळाव तसं जबरदस्त ओपनिंग अ.ब.क. ला मिळालं! सुनिल शेट्टींनी साकारलेला बप्पा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला तर तमन्ना भाटियाच्या प्रबोधनाने अनेकांचे डोळे पानावले. ज्याचं कुणी नाही त्याचा मी आहे! असं म्हणत किशोर कदम यांनी रंगवलेल्या आज्या अप्रतिम, आदर्श शिंदे गायलेलं गीत एैकताना हुंदका आनावर होतो. साहिल जोशीने साकारलेला हरी आणि मैथिली पटवर्धन ने साकारलेली जनी लाजवाब! खरंतर बहिण भांवाच्या नात्याची ही अनोखी गुंफन आहे; आणि ती छान जमली आहे. चिमुकल्या दोन अनाथ जीवांचा स्वप्नपुर्तिचा प्रवास दाखविण्यासाठी दिग्दर्शक रामकुमार शेडगे हे यशस्वी झाले आहेत. ग्रॅव्हीटी एंटरटेन्मेंट आणि निर्माते मिहीर सुधीर कुलकर्णी यांनी एक उत्तम चित्रपट रसिकांच्या भेटीला आणला. त्यामुळे ते कौतुकास पात्र आहेत! चित्रपटात विजय पाटकर, सतिश पुळेकर, कमलेश सावंत, प्रेमा किरण यांना आपल्या व्यक्तिरेखा छान साकारलेल्या आहेत. बापी तितुल यांचे संगीत श्रवणीय तर आहेच पण ते चिरकाल स्मरणात आहे. अश्विनी शेंडे यांचे शब्द हृदयाचा ठाव घेतात. अमृता फडणवीस यांचे प्रेरणा गीत प्रशंसनीय आहे. प्रसिद्ध कॅमेरामन महेश आने यांनी अ.ब.क. चित्रपट वेगळया उंचीवर नेवून ठेवला आहे. ऑस्कर फेम सनी पवार ने साक जमला आहे. अर्थातच उच्च तांत्रिक मूल्य असणारा अ.ब.क. सर्वच बाबतीत सरस ठरतो. या चित्रपटाचा आत्मा आहे, ती या चित्रपटाची कथा, जिथे माणसाच्या आयुष्याचा शेवट होतो, तिथेच कुणाच्यातरी आयुष्याची सुरूवात व्हावी ही कल्पनाच अप्रतिम आहे, साचेबद्ध पटकथा नेमके संवाद यांचे श्रेय लेखक आबा गायकवाड यांनाच द्यावे लागेल. दिग्दर्शक रामकुमार शेडगे आणि निर्माते मिहीर कुलकर्णी यांनी एका दमदार चित्रपटाची मेजवानी रसिकांना दिली आहे. त्याचा लाभ प्रेक्षक नक्कीच घेतील. धमाकेदार ओपनिंग मिळालेला अ.ब.क. पहिल्या आठवड्यात किती कोटीची कमाई करणार यावर आता चित्रपट इंडस्ट्रीज चर्चा रंगु लागल्या आहेत! अ.ब.क. रसिकांच्या पसंतीस उतरला यातच चित्रपटाचे खरे यश आहे.