Join us

पाहा काय म्हणाला या विषयी जितेंद्र जोशी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2017 3:59 PM

'छत्रपती शिवाजी महाराज कोणा एका जातीचे नव्हते आणि आजही नाहीत. मात्र, त्यांच्या नावानं केलं जाणारं राजकारण अत्यंत चुकीचं आहे' ...

'छत्रपती शिवाजी महाराज कोणा एका जातीचे नव्हते आणि आजही नाहीत. मात्र, त्यांच्या नावानं केलं जाणारं राजकारण अत्यंत चुकीचं आहे' असं अभिनेता जितेंद्र जोशीनं म्हटलंय. 'बघतोस काय मुजरा कर' या चित्रपटाच्या ट्रेलरचं नुकतंच सिंहगडावर अनोख्या पद्धतीनं लोकार्पण करण्यात आलं, त्यावेळी जितेंद्र बोलत होता. पहिल्यांदाच एका मराठी चित्रपटाच्या ट्रेलरचं लोकार्पण पहिल्यांदाच गडावर करण्यात आलं. यावेळी 'तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय'च्या घोषणांनी वातावरण दणाणून गेलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचं भूमीपूजन नुकतंच झालं. ३६००० कोटी रुपये खर्चून हे स्मारक उभारण्याबरोबरच राज्यातील गडकिल्ल्यांचं संवर्धन करावं, असा सूर सोशल मीडियात दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर, गडकिल्ल्यांच्या संवर्धनाच्या विषयाला आणि शिवाजी महाराजांचं नाव वापरून केल्या जाणा?्या राजकारणाला वाचा फोडण्याचं काम बहुचर्चित 'बघतोस काय मुजरा कर' या चित्रपटातून केलं जाणार आहे. 'पोस्टर गर्ल'सारखे अनेक उत्तम चित्रपट लिहिलेला अभिनेता हेमंत ढोमे 'बघतोस काय मुजरा कर' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण करतो आहे. हेमंत ढोमे या चित्रपटासाठी फारच उत्सुक असून हा सिनेमा येत्या ३ फेबु्रवारीला प्रदर्शित होणार आहे.