Join us  

या अभिनेत्रीला ओळखलं का? आई प्रसिद्ध अभिनेत्री! 'लाईक आणि सबस्क्राईब'मधून रुपेरी पडद्यावर पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 5:33 PM

अमेय वाघ - अमृता खानविलकरच्या 'लाईक आणि सबस्क्राईब' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची लेक झळकणार आहे (like ani subscribe)

सध्या एका मराठी चित्रपटाची उत्सुकता आहे. हा चित्रपट म्हणजे 'लाईक आणि सबस्क्राईब'. या चित्रपटात अमेय वाघ आणि अमृता खानविलकर प्रमुख भूमिकेत आहेत.  'लाईक आणि सबस्क्राईब' असे नाव असलेल्या या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अमृता खानविलकर, अमेय वाघ आणि आणखी एक चेहरा झळकला होता. काहींनी हा चेहरा ओळखला. तर काहींना हा नवीन चेहरा कोणाचा, असा प्रश्न पडला होता. या चित्रपटातून अभिनेत्री जुई भागवत रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. विशेष गोष्ट म्हणजे जुईची आईही मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. त्यांचं नाव दीप्ती भागवत.

पहिल्या सिनेमाबद्दल जुई काय म्हणाली?

 'तुमची मुलगी काय करते?' या मालिकेत जुई भागवतने प्रमुख भूमिका साकारली. 'लाईक आणि सबस्क्राईब' च्या माध्यमातून जुई मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. जुई एक उत्तम नर्तिका आणि गायिकाही आहे. आपल्या चित्रपटातील पदार्पणाबद्दल जुई भागवत म्हणते, '' माझी आई एक उत्तम अभिनेत्री आहे, सूत्रसंचालिका आहे. त्यामुळे बालपणापासूनच माझ्यावर नकळत अभिनयाचे संस्कार होत गेले. याआधीही मी एका मालिकेत बालकलाकाराचे काम केले होते,. एका शोमध्येही सहभागी झाले होते. मालिका केली. आता 'लाईक आणि सबस्क्राईब'मधून मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाले आहे. यातील माझी भूमिका खूपच वेगळी असून हा एक रहस्यमय चित्रपट आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी खूप जास्त उत्सुक आहे. चित्रपटाची कथा एकदम जबरदस्त आहे, त्यात पदार्पणात अशा कलाकारांसोबत, टीमसोबत काम करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. संपूर्ण टीमकडून बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. एका नवोदिताला आणखी काय हवे असते?"

कधी होणार लाईक आणि सबस्क्राइब रिलीज

नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत,  आणि अभिषेक मेरूकर प्रॉडक्शन्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य, अभिषेक मेरूकर निर्माते असून 'लाईक आणि सबस्क्राईब'चे लेखन आणि दिग्दर्शन अभिषेक मेरूकर यांनी केले आहे. यात अमेय वाघ, जुई भागवत, अमृता खानविलकर, शुभंकर तावडे, विठ्ठल काळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या १८ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :अमेय वाघअमृता खानविलकरमराठी चित्रपट