Join us

'आमच्या पिढीसाठी अभिनयाची शाळाच होती', अश्विनी भावेंनी वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 5:41 PM

Vikram Gokhale : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंचे आज पुण्यात निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ७७व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.

मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि मालिका अशा अभिनयाच्या सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलें(Vikram Gokhale)चे आज पुण्यात निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ७७व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनावर सोशल मीडियावर सर्वस्तरांतून आदरांजली अर्पण केली जात आहे. अभिनेत्री अश्विनी भावे यांनी त्यांच्यासोबतचे फोटो शेअर करत श्रद्धांजली वाहिली.

अश्विनी भावे यांनी इंस्टाग्रामवर  फोटो शेअर करत विूक्रम गोखले यांच्यासोबतचे फोटो शेअर करून त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी लिहिले की, आज आपण एक अद्वितीय अभिनेता आणि एक सहृदयी माणूस गमावला. त्यांच्या जाण्याने कला क्षेत्राचे खूप मोठं नुकसान झाले आहे ,जे कधीही भरून काढता येणार नाही.

त्यांनी पुढे म्हटले की, विक्रम गोखले म्हणजे आमच्या पिढीसाठी अभिनयाची शाळाच होती. माझ्या करिअरमधील तीन उत्तम आणि गाजलेल्या कलाकृतींमध्ये (पार्टनर मालिका, कळत नकळत आणि वजीर सिनेमा) विक्रमजींसोबत काम करण्याची संधी मला मिळाली. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकता आल्या. त्यांच्या अनेक आठवणी कायम माझ्यासोबत असतील! आम्हाला तुमची आठवण येईल.

टॅग्स :विक्रम गोखलेअश्विनी भावे