अभिनेता अनिकेत केळकरचा राजकारणात प्रवेश!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 06:27 AM2018-03-23T06:27:16+5:302018-03-23T12:02:16+5:30

गेल्या पाच सहा वर्षापासून “लक्ष्य” या मालिकेतून आपल्या समोर  पोलिस इन्स्पेक्टर म्हणून येणारा अभिनेता म्हणजे अनिकेत केळकर. “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” ...

Actor Aniket Kelkar enters politics! | अभिनेता अनिकेत केळकरचा राजकारणात प्रवेश!

अभिनेता अनिकेत केळकरचा राजकारणात प्रवेश!

googlenewsNext
ल्या पाच सहा वर्षापासून “लक्ष्य” या मालिकेतून आपल्या समोर  पोलिस इन्स्पेक्टर म्हणून येणारा अभिनेता म्हणजे अनिकेत केळकर. “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे कर्तव्य मालिकेत अगदी चोख पार पाडणारा अनिकेत केळकर आता राजकारणात प्रवेश करत आहे. काय मंडळी घाबरलात ना? अहो अखिल देसाई दिग्दर्शित “मोर्चा” या मराठी सिनेमात अनिकेत राजकीय पुढारी साकारतो आहे. हा सिनेमा २३ मार्चला आपल्या सर्वत्र आपल्या भेटीला येत आहे. चला तर मग बघूया या सिनेमामध्ये अनिकेत केळकर याची नेमकी कोणती भूमिका आहे.

“मोर्चा” हा सिनेमा आपल्या समाजव्यवस्थेवर भाष्य करणारा सिनेमा आहे. “मोर्चा” या सिनेमामध्ये अनिकेत केळकर आपल्याला एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. यात अनिकेत मेहुल घोडके या राजकीय नेत्याची भूमिकेत साकारत असून, हा मेहुल घोडके आजच्या राजकारणातील व्यक्तीचे प्रतिनिधित्व करतो. राजकीय नेत्याची भूमिका साकारण्याची ही अनिकेत केळकर यांची पहिलीच वेळ आहे.

अनिकेत केळकर या सिनेमाबद्दल सांगतो की, राजकीय नेते जे निवडून आले होते त्यांनी काय केलं? आणि जे निवडून आले आहेत ते काय करत आहेत आणि पुढे जे निवडून येणार आहेत त्यांनी काय केलं पाहिजे या सर्व गोष्टींवर भाष्य करणारा “मोर्चा” हा सिनेमा आहे.

माझ्यासोबत सिनेमात संजय खापरे, कमलेश सावंत, दिगंबर नाईक, दुष्यंत वाघ, उदय सबनीस, किशोर चौगुले, गौरी कदम, अंशुमन विचारे, आरती सोळंकी, संदीप गायकवाड, संदीप जुवटकर, संजय पाटील आणि प्रिया यांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत.

दिग्दर्शक अखिल देसाई सिनेमाबद्दल सांगतात कि, मोर्चा सिनेमाबद्दल एका वाक्यात सांगायचे झाले तर, सिनेमा म्हणजे आजच्या भ्रष्ट राजकीय व्यवस्थेविरोधात मोर्चा बांधणी आहे. निवडणूक होतात. आपण उमेदवारांना निवडून देतो. निवडून आल्यावर त्यांना गुर्मी येते आणि ते जनतेला गृहीत धरतात यावरच हा सिनेमा कडाडून भाष्य करतो. गावात तर विकास नाहीच नाही, पण मुंबई सारख्या शहरात सुद्धा माणूस घरी सुखरूप परत येईल कि नाही याची शाश्वती नाही.मुंबईत कोसळलेला एलफिस्टन पूल असेल, बलात्कार, भ्रष्टाचार या सगळ्या गोष्टीवर आपण फक्त बोलत बसतो नाहीतर फक्त मोर्चे काढत बसतो.असे किती दिवस अजून आपण मोर्चे काढत बसणार आहोत.या प्रश्नांबाबत आपण राजकीय नेत्यांना सरळ प्रश्न कधी विचारणार? कुठवर त्यांची हुकुमशाही सहन करणार याबद्दल सिनेमा भाष्य करतो.

Web Title: Actor Aniket Kelkar enters politics!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.