अस्सल आगरी कोळी भाषेत आपला जलवा दाखवाणारा स्टायलिश ‘बाबू’ (Babu Movie) २ ॲागस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात बाबूची भूमिका अभिनेता अंकित मोहन (Ankit Mohan) साकारणार आहे. तो या चित्रपटात एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. सध्या मयूर शिंदे दिग्दर्शित 'बाबू' चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. आज नवी मुंबईतील एका मासे मार्केटमध्ये प्रमोशन दरम्यान अंकित मोहनच्या हाताला गंभीर दुखापत झाली. तातडीने प्रथमोपचार करण्यात आले आहेत.
आगरी कोळी भाषेचा झणझणीत जलवा दाखवणाऱ्या या चित्रपटातील 'बाबू' म्हणजेच अंकित मोहन, रूचिरा जाधव पारंपरिक पेहरावात नुकतेच आपल्या कोळी बांधवाना, भगिनींना भेटायला नवी मुंबईतील एका मासे मार्केटमध्ये गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत निर्माते बाबू कृष्णा भोईरही होते. टायटल साँगवर नृत्य करताना धारदार कोयता लागून अंकितच्या हाताला गंभीर दुखापत झाली. दरम्यान अंकितला प्रथमोपचार करण्यात आले आहेत.
मयूर शिंदे दिग्दर्शित 'बाबू' चित्रपट येत्या २ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अंकित मोहन, नेहा महाजन आणि रुचिरा जाधव हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. श्री समर्थ कृपा प्रोडक्शन प्रस्तुत 'बाबू' या चित्रपटाची निर्मिती सुनीता बाबू भोईर, बाबू कृष्णा भोईर यांनी केली आहे. तर या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा मयूर मधुकर शिंदे यांनी सांभाळली आहे. दिग्दर्शक मयूर मधुकर शिंदे म्हणाले, "मराठी चित्रपटात भावनिकता, विनोद, कमाल कथा या सगळ्यांचा समावेश असतोच परंतु 'बाबू' चित्रपटातून जबरदस्त ॲक्शन, स्टाईल, यांचा धमाकेदार संगम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यात अंकित मोहन सारखा जबरदस्त हिरो असल्याने हा ‘बाबू’ अधिकच रंगला आहे.