Join us

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने थायलँडमध्ये सेलिब्रेट केला लग्नाचा तिसरा वाढदिवस!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2017 5:10 AM

मराठी टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतही सध्या ‘आया मौसम लग्नाचा’ अशीच काहीशी परिस्थिती आहे. आपल्या अभिनयाने रसिकांचे मनोरंजन करणारे मराठी मनोरंजन ...

मराठी टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतही सध्या ‘आया मौसम लग्नाचा’ अशीच काहीशी परिस्थिती आहे. आपल्या अभिनयाने रसिकांचे मनोरंजन करणारे मराठी मनोरंजन दुनियेतील अभिनेता आणि अभिनेत्री रेशीमगाठीत अडकले आहेत. कुणी आपला जोडीदार स्वतः निवडत लव्ह मॅरेज करणे पसंत केले आहे. तर काहींनी आपल्या आईवडिल तसेच कुटुंबीयांच्या पसंतीला सकारात्मक होकार देत लग्नाच्या बंधनात अडकले आहेत.लग्न रिसेप्शन अशा सगळ्या सोहळ्यातील या कलाकारांचे सगळे खास क्षण चाहत्यांनाही सोशल मीडियाच्या माध्यमातून कळत असतात. सध्या अनेक कलाकारमंडळी त्यांच्या जोडीदाराबरोबर एन्जॉय करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गेल्याचे पाहायला मिळतंय.काही हनिमूनसाठी परदेशात गेले आहेत. तर काही वेडिंग अॅनिव्हर्सरीचे सेलिब्रेशन करण्यासाठी परदेशात एन्जॉय करताना दिसतायेत.कलाकारांना त्यांच्या बिझी शेड्युल्डमुळे स्वत:साठी सहसा वेळ मिळत नाही.सतत लाईट, कॅमेरा आणि अ‍ॅक्शनच्या झगमगाटात राहणारे हे कलाकार कधी वेळ मिळालाच तर मस्त एन्जॉय करताना दिसतात. सध्या असाच वेळ काढुन अपूर्वा नेमळेकर थायलंडला रवाना झाली. तिने थायलँडमध्ये पती रोहन देशपांडेसोबत त्यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला आहे. या सेलिब्रेशनचे खास फोटो अपूर्वाने तिच्या फॅन्ससाठी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.फोटोत ती मस्त निवांत क्षण एन्जॉय करताना दिसतायेत.त्याचबरोबर नेहमीप्रमाणे फोटोत तिचा ग्लॅमरस लुकही पाहायला मिळत आहे.अगदी पारंपारिक रिती रिवाजाने  अपूर्वा आणि रोहनचे लग्न 18 डिसेंबर 2014 रोजी मुंबईत पार पडले होते.‘आराधना’, ‘आभास हा’, ‘तू जीवाला गुंतवावे’ ही मालिका आणि ‘भाकरखडी’ चित्रपटातही अपुर्वा नेमळेकर झळकली होती.तसेच 'आलाय मोठा शहाणा' या विनोदी नाटकाद्वारे तिने रंगभूमीवरही पदार्पण केले होते. Also Read:संस्कृती बालगुडे करतेय व्हॅकेशन एन्जॉय,समोर आले Photoकाही दिवसांपूर्वीच  असाच वेळ काढुन संस्कृती बालगुडे थायलंडलामध्ये व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसली होती. थायलंडमध्ये क्लिक केलेले तिचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.फोटोत ती मस्त निवांत क्षण एन्जॉय करताना दिसतेय.निसर्गाच्या सानिध्यात एकांत घालवत फुल ऑन एन्जॉय करतानाचे अनेक खास फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.