Join us

Aroh welankar :“महाविकासआघाडीची वेळ संपत आलीय.." एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आरोह वेलणकरचे ट्विट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 1:24 PM

Aroh welankarTweet : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर अभिनेता आरोह वेलणकरने महाविकासआघाडीवर भाष्य केलं आहे.

शिवसेनेत बंडखोरीचं वादळ निर्माण झाल्यानंतर याचा नवा अंक आज गुवाहटीत पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसोबत आज पहाटे गुवाहटीला पोहोचले आहेत. गुवाहटीच्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये आमदारांना ठेवण्यात आलं आहे. आसाम विमानतळावर पोहोचताच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ४० आमदार सोबत असल्याचा दावा केला आहे. तर आणखी १० आमदार आज येणार असल्याचंही म्हटलं आहे. याच दरम्यान मराठीतील लोकप्रिय अभिनेता आरोह वेलणकर (Aroh welankar)ने यावर भाष्य केलं आहे.

आरोह वेलणकर नेहमीच राजकीय घडामोडींवर आपलं मतं सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असतो. यावेळी त्याने महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. “महाराष्ट्राचे एकूण ५० आमदार हे सध्या आसाममधील गुवाहाटी इथे उपस्थित आहेत. “महाविकासआघाडीची वेळ संपत आलीय, असे मला वाटतं आहे. चला पाहू पुढे काय होतंय?” असे ट्विट आरोहने केले आहे. त्याच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या असून सध्या त्याच्या ट्विटची जोरदार चर्चा रंगली आहे.

हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारणारे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे इतर शिवसेना आमदार गुवाहाटी येथे दाखल झाले आहेत. पहाटे तीनच्या सुमारास गुजरातमधील सूरत येथून निघालेले हे आमदार सकाळी सातच्या सुमारास गुवाहाटी येथे पोहोचले. त्यांना नेण्यासाठी आसाम स्टेट ट्रान्सपोर्टच्या बस सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. त्यामधून ते गुवाहाटीमधील एका हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत.

टॅग्स :आरोह वेलणकरएकनाथ शिंदेशिवसेनासेलिब्रिटी