Join us

"गिरीजा ओक कित्येक वर्ष माझ्याशी बोलत नव्हती.."; अशोक सराफ यांनी केला खुलासा; नेमकं काय घडलं?

By देवेंद्र जाधव | Updated: February 25, 2025 15:26 IST

अशोक सराफ यांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत एक खास किस्सा सांगितला. यात त्यांनी गिरीजा त्यांच्याशी का बोलत नव्हती याचा खुलासा केला (ashok saraf)

अशोक सराफ (ashok saraf) यांनी आजवर विविध सिनेमांमधून अभिनय क्षेत्र गाजवलंय. अशोक सराफ यांचे सिनेमे प्रेक्षकांना खळखळून हसवतात. याशिवाय काही सिनेमांमध्ये अशोक सराफ यांनी साकारलेल्या गंभीर भूमिकाही चांगल्याच गाजल्या. अशोक सराफ यांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला. जेव्हा त्यांच्या एका भूमिकेमुळे अभिनेत्री गिरीज ओक (girija oak) त्यांच्याशी बोलली नव्हती. काय होता तो किस्सा? जाणून घ्या.

गिरीजा अशोक सराफ यांच्याशी का बोलायची नाही?

अशोक सराफ यांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की अनेकदा लोक त्यांच्याकडे कॉमेडी भूमिका करतो म्हणून बघतात. पण जेव्हा अशोकमामा खलनायक साकारतात तेव्हा काय होतं, याचा खास किस्सा त्यांनी सांगितला.

अशोक सराफ म्हणाले, "हा विनोदी नट आहे असं न होता हा इतर भूमिकाही करु शकतो असं लोकांना कळावं असा माझा हेतू असतो. मी कॅरेक्टर आर्टिस्ट आहे. लोकांना जर माझ्या एखाद्या कॅरेक्टरचा राग येत असेल तर ती माझी पावती आहे. इतर रोलचा राग येत असेल तर माझी कॉमेडी किती चांगली आहे, हे यातून सिद्ध होतं. काही लोकांनी माझे पिक्चर बघायचे पण टाळले. वाट पाहते पुनवेची हा सिनेमा मी केला होता. त्या पिक्चरमध्ये मी खलनायक साकारला होता."

"त्या सिनेमात गिरीश ओक होता. गिरीश या पिक्चरमध्ये हँडीकॅप असतो. या पिक्चरमध्ये गिरीश ओकला मी फार वाईट वाटतो.  हे बघितल्यानंतर गिरीजा ओक कित्येक वर्ष माझ्याशी बोलत नव्हती. त्यावेळी ती लहान होती. तिने बघितलं की, हा माणूस माझ्या वडिलांना वाईट वागणूक देतोय. गिरीजा कुठे भेटल्यावर मला ओळख का दाखवत नाही? असा प्रश्न पडायचा. नंतर मला कळलं की गिरीजाला तो राग होता. तेव्हा मी स्वतःला सॅल्यूट केलं की वाह!"

 

टॅग्स :अशोक सराफगिरिजा ओकमराठी चित्रपट