Join us

"२०१६ नंतर मी..."; भरत जाधव यांचा मोठा खुलासा, मराठी चित्रपटात काम न करण्यामागचं कारण सांगितलं

By देवेंद्र जाधव | Updated: April 9, 2025 12:22 IST

भरत जाधव गेली चार-पाच वर्ष मराठी सिनेमात इतके का दिसत नाहीत, यामागचं कारण त्यांनी सर्वांना सांगितलं आहे

भरत जाधव (bharat jadhav) हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते. 'जत्रा', 'बकुळा नामदेव घोटाळे', 'ह्यांचा काही नेम नाही', 'शिक्षणाच्या आयचा घो', 'फक्त लढ म्हणा' अशा विविध सिनेमांमधून भरत जाधव यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं. भरत यांचे सिनेमे म्हणजे मनोरंजनाची हमखास खात्री, असं म्हटलं जातं. भरत जाधव गेले काही वर्ष मराठी रंगभूमीवर सक्रीय आहेत पण सिनेमात इतके दिसत नाहीत. काय आहे यामागचं कारण? 

...म्हणून भरत जाधव सध्या सिनेमात कमी दिसतात?

भरत जाधव यांनी अमोल परचुरेंच्या कॅचअप या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत याविषयी खुलासा केला. गेली काही वर्ष भरत जाधव मराठी सिनेमात इतके का दिसत नाहीत, असं विचारताच ते म्हणाले की, "काही चित्रपट करता करता मला जरा तेच तेच रोल यायला लागले. म्हणून मी काही वर्षांपूर्वी म्हणजे २०१६ - १७ नंतर जरा थांबलोच होतो."  भरत जाधव यांनी काही महिन्यांपूर्वी 'लंडन मिसळ' सिनेमात काम केलं होतं. त्या सिनेमाबद्दल विचारलं असता ते म्हणाले, "त्याला कारणं आहेत वेगवेगळी."

अशाप्रकारे भरत जाधव यांनी सध्या ते मराठी चित्रपटात काम का करत नाहीत, याविषयी खुलासा केला. भरत जाधव लवकरच आशुतोष गोवारीकर यांच्यासोबत आगामी मराठी सिनेमात काम करणार आहेत. भरत जाधव सध्या रंगभूमीवर कार्यरत असून 'पुन्हा सही रे सही', 'मोरुची मावशी' आणि 'श्रीमंत दामोदरपंत' या तीन नाटकांमध्ये ते काम करत आहेत. भरत जाधव यांना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत.

टॅग्स :भरत जाधवमराठी अभिनेतामराठी चित्रपटमराठी