मराठी कलाविश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते क्षितीज झारापकर (Kshitij Zarapkar) यांचे आज सकाळी निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते. दुपारी दीड ते दोन वाजताच्या सुमारास त्यांचे पार्थिव दादर शिवाजी पार्क येथील त्यांच्या राहत्या घरी अत्यंदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या निधनामुळे मराठी सिनेइंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.
क्षितीज झारापकर यांचे कर्करोगामुळे निधन झाल्याचे समजते आहे. आज सकाळी १० वाजताच्या सुमारास त्यांची मुंबईतील एका खासगी रुग्णालयात प्राणज्योत मालवली. मागील अनेक महिन्यांपासून ते कर्करोगाशी सामना करत होते. मल्टिपल ऑर्गन डिसऑर्डर झाल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
क्षितीज झारापकर हे उत्तम अभिनेते होतेच. शिवाय ते लेखक आणि दिग्दर्शक होते. त्यांनी एकुलती एक, आयडियाची कल्पना, गोळाबेरीज, ठेंगा, यांसारख्या सिनेमांत काम केले आहे. ते हा चर्चा तर होणारच या आस्ताद काळे आणि अदिती सारंगधर यांच्या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.