प्रसाद ओक (Prasad oak) हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. दर्जेदार अभिनयामुळे ओळखला जाणार प्रसाद सध्या त्याच्या उत्तम दिग्दर्शकीय कौशल्यामुळे चर्चेत येत आहे. दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करणारा प्रसाद आणि त्याची पत्नी मंजिरी ओक (manjiri oak) दोघंही सोशल मीडियावर कमालीचे सक्रीय आहेत. त्यामुळे अनेकदा दोघांचे रिल्सही सोशल मीडियावर चर्चेत येत असतात.
प्रसाद ओकने सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. प्रसाद ओक या व्हिडीओत म्हणतोय, 'आमच्या घरात दोन वाक्य कायम ऐकू येतात... एक.. कपडे ठेवायला जागाच नाहीय यार.. एक नवीन कपाट बनवूया? आणि दुसरं.. बाहेर जायला माझ्याकडे कपडेच नाहीयत यार... आणि ही दोन्ही वाक्यं एकच व्यक्ती बोलते..' हा व्हिडीओ शेअर करताना प्रसादने थेट चाहत्यांना प्रश्न विचारला आहे, ओळखा बरं ही व्यक्ती कोण?'' अर्थातच ही व्यक्ती म्हणजे मंजिरी ओक. प्रसादने ही तक्रार अत्यंत मजेशीर पद्धतीने चाहत्यांसोबत मांडली आहे. त्याच्या या व्हिडिओला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
मस्कारा पण ना ? मला तीचं हे वागणं अजीबात आवडत नाही. अशी कमेंट यावर मंजिरी ओकनेच केली आहे. हाहाहा मला माहिती आहे असं अमृता खानविलकर म्हणतेय. अंतिम सत्य आहे सर ते !! नवऱ्याला तर त्याच्या ही कप्प्यात . जागा नसते, दादा त्या व्यक्ती चं नावं ध्या नावं, बायको शिवाय कोण असणार अशा मजेशीर कमेंट्स चाहत्यांनी यावर केल्या आहेत.
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर प्रसादचा ‘धर्मवीर 2’ सिनेमाची ही अधिकृत घोषणा झाली आहे. त्यामुळे २०२३मध्ये प्रसाद ओकच्या अभिनय कौशल्याची जादू प्रेक्षकांना पुन्हा अनुभवता येणार आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद तसेच दिग्दर्शन प्रवीण तरडे यांचे आहे.