गेल्या महिन्याभरापासून सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत केवळ चंद्रा (Chandra) या एकाच नावाची चर्चा सुरु आहे. विश्वास पाटील (Vishwas Patil) यांच्या 'चंद्रमुखी' या कादंबरीवर आधारित 'चंद्रमुखी' (Chandramukhi ) हा चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक (Prasad Oak) याने दिग्दर्शित केला. या चित्रपटात अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) आणि आदिनाथ कोठारे (adinath kothare) यांची मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन बरेच दिवस उलटले आहेत. मात्र, या चित्रपटाच्या सेटवरील आठवणी कलाकारांच्या मनात ताज्या आहेत. त्यामुळेच प्रसाद ओकने एक खास पोस्ट शेअर केली आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या प्रसाद ओकने अलिकडेच इन्स्टाग्राम एक व्हिडीओ पोस्ट शेअर केली आहे.सिनेमातील 'कान्हा' ( Kanha) हे फार सुंदर आणि भावूक गाण्यावरचा एक शॉर्ट व्हिडीओ प्रसादनं शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्याने चंद्रमुखीच्या सेटवरील काही फोटो कोलाज करुन त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. सोबतच लक्ष वेधून घेणारं कॅप्शन दिलं आहे.का संगतीचं सुख खुनावत राही रं, का बिलगून मन रितं रितं राही रं "चंद्रमुखी" चे शूटिंग चे दिवस असं कॅप्शन त्याने या पोस्टला दिलं आहे.
दरम्यान, प्रसाद ओकचा ड्रीम प्रोजेक्ट असेलला चंद्रमुखी हा सिनेमा 2 वर्षांपूर्वी शुट करण्यात आला होता. मात्र, लॉकडाऊनमुळे तो रखडला होता. चंद्रमुखी हा सिनेमा मुंबईसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी शुट करण्यात आला. सिनेमाचं दिग्दर्शन प्रसाद ओक याने केले होतं तर सिनेमॅटोग्राफीची धुरा संजय नेमाणे यांनी हाती घेतली होती.