Join us

अभिनेता पुष्कर जोगने सांगितले की चित्रपट 'वेल डन बेबी' का आहे त्याच्यासाठी इतका खास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 17:46 IST

‘वेल डन बेबी’ची कहाणी आधुनिक काळातील जोडप्याभोवती फिरत आहे.

 ‘वेल डन बेबी’ या आगामी मराठी चित्रपटाची कथा आपल्याला प्रेम, आयुष्य यांच्यासोबत एका भावनात्मक रोलरकोस्टरमध्ये घेऊन जाते. अभिनय, प्रोडक्शन आणि कॉन्सेप्टचा विचर करताना, या चित्रपटाविषयी बहुआयामी पुष्कर जोग याच्या मनात आणि विचारामध्ये देखील याला एक विशेष स्थान आहे.  

पुष्करसाठी हा चित्रपट इतका खास का आहे, या विषयी बोलताना, पुष्कर (जो चित्रपटात मुख्य अभिनेता आदित्यची भूमिका साकारतो आहे) म्हणाला, “वेल डन बेबीच्या कथेला माझ्या मनात एक विशेष स्थान आहे. मी यातील व्यक्तिरेखेला अगदी स्वाभाविकपणे सादर करू शकतो, मी त्याच्यासोबत स्वत:ला पूर्णपणे जोडून घेऊ शकतो, कारण मी हल्लीच बाबा झालो आहे. माझा स्वत:चा वैयक्तिक अनुभव डोळे उघडणारा होता ज्यामुळे मी या चित्रपटाची स्क्रिप्ट आणि आदित्यची व्यक्तिरेखा यांचा संबंध अनुभवू शकतो. संपूर्ण प्रवास, एका जोडप्यामधील जटीलतेपासून, तो क्षण त्यांच्या आई बाबा बनण्यापर्यंतचा, खऱ्या अर्थाने जवळ येण्याचा आहे; गर्भावस्थेची प्रत्येक पायरी आपल्या आपल्यामध्येच एक आनंददायक एडवेंचर आहे. मला विश्वास आहे कि प्रेक्षक देखील या अंतहीन कथेला तितकेच खास समझून घेतील जितकी ती माझ्यासाठी आहे." 

‘वेल डन बेबी’ची कहाणी आधुनिक काळातील जोडप्याभोवती फिरत आहे, जे घटस्फोट घेणार आहेत, परंतु नशिबाने त्यांना आश्चर्यकारकरीत्या एका वळणावर आणून उभे केले आहे. प्रियंका तन्वर दिग्दर्शित आणि मर्मबंधा गव्हाणे लिखित, या चित्रपटात पुष्कर जोग, अमृता खानविलकर आणि वंदना गुप्ते मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

टॅग्स :पुष्कर जोग