उभ्या महाराष्ट्राला 'वेड' करुन सोडणारा अभिनेता, दिग्दर्शक म्हणजे रितेश देशमुख. मराठीसह हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाचा डंका वाजवणाऱ्या रितेश देशमुख याने काही काळापूर्वीच दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. वेड या सिनेमाच्या माध्यमातून त्याने त्याच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीला सुरुवात केली. विशेष म्हणजे त्याच्या या डेब्यू फिल्मसाठी त्याला 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' (Lokmat Maharashtrian Of The Year) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पण यावेळी त्याने पुरस्कार स्वीकारल्यानंतर राज ठाकरेंचे आभार मानले.
पहिल्या सुपरहिट ठरलेल्या 'वेड' या डेब्यू फिल्मसाठी रितेशला 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या पुरस्कार सोहळ्याला रितेशने पत्नी जिनिलीया व आईसह हजेरी लावली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरेही या पुरस्कार सोहळ्यात पत्नीसह उपस्थित होते. पुरस्कार स्विकारल्यानंतर रितेश देशमुखने स्टेजवरुनच राज ठाकरेंचे आभार मानले.
राज ठाकरे यांच्या हस्ते रितेशला पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार मिळाल्यानंतर रितेशने भर कार्यक्रमात सगळ्यांसमोरच राज ठाकरेंचे आभार मानले. रितेश म्हणाला, “राज ठाकरे यांच्या हस्ते मला पुरस्कार मिळाला. त्यांचे मी आभार मानतो. तुम्ही महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहात. पण, माझ्यासाठी आपली मैत्री फार जवळची आहे. मी आयुष्यभर आपली मैत्री जपेन.” सध्या रितेशचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.