वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका करणारा एक प्रयोगशील अभिनेता म्हणून अभिनेता संदीप पाठक नेहमीच चर्चेत असतो. संदीपने मालिका, चित्रपटांत त्यानं विविध भूमिका केल्या. २०१०मध्ये आलेल्या 'श्वास'मधील त्याच्या भूमिकेची चांगलीच चर्चा झाली. त्यानंतर 'हरिश्चंद्राची फॅक्टरी', 'एक डाव धोबीपछाड', शहाणपण देगा देवा', 'रंगा पतंगा', 'पोस्टर गर्ल' यांसारख्या चित्रपटांतून, 'फू बाई फू', 'घडलंय बिघडलंय', 'असंभव', 'एका लग्नाची दुसरी गोष्ट', अशा मालिकांतून, 'असा मी असामी', 'लग्नकल्लोळ', 'जादू तेरी नजर', 'ज्याचा शेवट गोड', 'सासू माझी धांसू' या नाटकांतून तो प्रेक्षकांसमोर आला.
संदीप सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो. संदीप पाठकनं नुकताच वाती कमिंग गाण्यावर एक भन्नाट व्हिडिओ शूट केलाये.. सोसायटीतील मुलांसोबतचा त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर कमालीचा चर्चेत आहे.. संदीपनं या ट्रेण्डिंग गाण्यावर व्हिडिओ तयार करत मोलाचा संदेश दिला आहे..
डान्स आणि धम्माल करत आपण या कोरोनाच्या काळात स्वत:ला कसं फिट ठेवून शकतो हे दाखवण्याचा त्यानं प्रयत्न त्याने या व्हिडीओच्या माध्यमातून केलं आहे. मास्क लावणं.. सॅनिटायझर वापरणं .. गरम पाण्याची वाफ घेणं.. गरजेचं असल्याचं संदीप या व्हिडीओतून सांगतोय.
कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलंय. " मी माझ्या सोसायटीतल्या छोट्या मित्रांसोबत रील केली आहे. ह्या छोट्या मित्रांचा अभिनय क्षेत्राशी काही संबंध नसताना त्यांनी ह्या रीलचं शुटींग खूप Enjoy केलं, Thanks Friends सध्याच्या कोरोना काळात "स्वत:ची काळजी घ्या" एवढा संदेश देण्याचा छोटा प्रयत्न.. गोड मानून घ्या"