Join us  

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर लंडनमध्ये बायकोला करतोय मिस, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 11:17 AM

Siddharth Chandekar: सिद्धार्थ आणि मिताली हे मराठी इंडस्ट्रीतलं क्युट कपल आहे. चाहत्यांचं हे लाडकं कपल एकमेकांवर प्रचंड प्रेम करतं.

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar)ने विविधांगी भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. सिद्धार्थ सोशल मीडियावर सक्रीय असून तो या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. बऱ्याचदा तो सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. नुकतीच त्याची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे. त्याच्या या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

सिद्धार्थ सध्या लंडनमध्ये लोकेश गुप्ते दिग्दर्शित CONGRATULATIONS या आगामी चित्रपटाचे शूटिंग करतोय. लंडनमध्ये असलेल्या सिद्धार्थ पत्नी आणि अभिनेत्री मिताली मयेकरला मिस करतोय. त्याने सोशल मीडियावर मिताली फोटो शेअर करत मला या चेहऱ्याची खूप आठवण येतेय असं कॅप्शन त्याने या फोटोसह दिलं आहे. सिद्धार्थच्या फोटोवर मितालीनेही कमेंट केली आहे. 

अलीकडेच सिद्धार्थने मितालीचा एक कॉमेडी व्हिडीओ शेअर केला होता. यात दोघेही एक लक्झरी बसमधून प्रवास करत होतो.प्रवासात मिताली मस्तपैकी झोप काढते आहे आणि सिद्धार्थने त्यावर नवं रील तयार केलं होतं. सिद्धार्थ आणि मिताली हे मराठी इंडस्ट्रीतलं क्युट कपल आहे. चाहत्यांचं हे लाडकं कपल एकमेकांवर प्रचंड प्रेम करतं. दोघं अनेकदा एकमेकांची मस्करी करतात, टिंगल करणारे व्हिडीओ शेअर करतात. पण दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. सिद्धार्थ जितकी मितालीची टिंगल करतो तितकंच प्रेम करतो आणि तिला सपोर्ट करतो हे अनेकदा दिसून आलं आहे.

दरम्यान CONGRATULATIONS सिनेमात सिद्धार्थसोबत अलका कुबल आणि पूजा सावंत झळकणार आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच हे तीन कलाकार एकत्र स्क्रीन शेअर करणार असल्यामुळे सोशल मीडियावर त्यांची जोरदार चर्चा सुरु आहे. 

टॅग्स :सिद्धार्थ चांदेकरमिताली मयेकर