Join us

सिद्धार्थ-सोनालीचं या चित्रपटाच्या सेटवर झालेलं जोरदार भांडण, अभिनेता म्हणाला- तिच्यासोबत माझा वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2023 09:25 IST

नुकत्याच लोकमत फिल्मी दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थनं सोनालीसोबतच्या भांडणावर भाष्य केलं.

 मराठी सिनेसृष्टीतही अनेक कलाकारांच्या भांडणाची चर्चा झाली. त्यातलं एक म्हणजे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव यांचं भांडण. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थनं तो आणि सोनाली जवळपास दहा वर्षे अजिबात बोलत नव्हतं, असं सांगितलं. पण आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात, असे काही क्षण येतात, त्यानंतर आपण सारं काही झालं गेलं विसरुन पुन्हा एकत्र येतो. असंच काहीसं या दोघांचं झालं.

नुकत्याच लोकमत फिल्मी दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थनं सोनालीसोबतच्या भांडणावर भाष्य केलं. तो म्हणाला, आमचं क्षणभर विश्रांतीच्या वेळेला भांडणं झालं होतं. मोठे भांडणं झालं होतं. तुम्ही जर चांगलं मित्र असतात तेव्हा जर तुमचे वाद झाले तर ते  विकोपाला जातात. सोनालीसोबतचा माझा वाद जवळपास १० वर्ष चालला.  

पुढे तो म्हणाला, श्रीदेवी गेल्या तेव्हा असं वाटलं की, माणसाचा काहीच भरवसा नाही. माझ्यासाठी तो वेगळा शॉक होता. त्या दुबईला गेला होत्या आणि त्यांच्या निधनाची बातमी आली. त्याआधी सोनालीने माझ्याशी खूप प्रयत्न केले होते बोलायचे. पण माझं ठरलं होतं नाही बोलायचं. पण त्यादरम्यान आम्ही काम करत होता. इरादा पक्का हा सिनेमा केला होता. सोनाली खूप प्रोफेशनल अभिनेत्री आहे. त्यानंतर मी तिला कॉल केला आणि बोलू लागलो. त्यानंतर आम्ही धुरळा एकत्र केला. सोनालीबद्दल मला वेगळी आत्मियता आहे. बकुळा नामदेव घोटाळा हा तिचा पहिला सिनेमा. मला केदार सरांनी पहिल्यांदा मुख्य भूमिकेत टाकलं होतं. नवखे दोघो एकत्र आलो होतो. त्यामुळे आमच्यातील मैत्री कमाल होती आणि आजही ती ज्या पद्धतीने काम करत मला नेहमी तिचा अभिमान वाटतो.      

टॅग्स :सिद्धार्थ जाधवसोनाली कुलकर्णी