Join us

बोलून कंटाळा आला; मराठीला मल्टिप्लेक्समध्ये एक स्क्रीनही मिळत नसेल तर...; सुबोध भावेची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2023 11:54 AM

सुबोध भावेनं सरकारविषयी आणि मराठी चित्रपटाच्या धोरणाविषयी त्याचं स्पष्ट मत माडलं. म्हणाला-महाराष्ट्रातच मराठी चित्रपटाविषयी कोणताही नियम नसेल,तर...

मालिकांपासून चित्रपटांपर्यंत अभिनयापासून दिग्दर्शनापर्यंत विविध क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करणारा अभिनेता म्हणजे सुबोध भावे (Subodh Bhave).सुबोध उत्तम अभिनेता. पण अभिनेता म्हणून सिद्ध केल्यानंतर तो कथाकार झाला, दिग्दर्शक झाला.डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटामध्ये त्याने काशीनाथ घाणेकर यांची भूमिका अतिशय समर्थपणे साकारली. आज सुबोधची नव्यानं ओळख करून देण्याची गरज नाही. लवकरच सुबोधचा वाळवी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत सुबोधनं मराठी सिनेमाच्या धोरणाविषयी आणि  सरकारविषयी भाष्य केलं. यावेळी बोलताना त्याने महाराष्ट्र सरकारामध्ये मराठी चित्रपटांना घेऊन उदासीनता असल्याचं म्हटलंय. ऐवढचं नाही तर वारंवार यावर सरकारशी यावर चर्चा करुन कंटाळा असल्याचं ही म्हटलंय. 

या मुलाखती दरम्यान सुबोधनं अनेक विषयांवर भाष्य केलं. सुबोध म्हणाला,'' मी आमची जबाबदारी कुठेही झटकत नाही वाईट सिनेमा करणं आमची चुक आहे ती मी मान्य करतो. पण चांगला सिनेमा केल्यानंतर त्याला प्रतिसाद देण्याची जबाबदारी प्रेक्षकांची असते आणि त्यांनीही ही पार पडली पाहिजं. दुसरं म्हणजे मराठी चित्रपटांच्या पाठिंब्याला घेऊन सरकारचे असलेल्या धोरणाविषयी मला बोलून कंटाळा आलाय. महाराष्ट्रात मराठी चित्रपटांना   मल्टिप्लेक्समध्ये एक स्क्रिनही मिळत नसेल तर काही बोलून उपयोग नाही.''

सुबोध पुढे म्हणाला, ''मल्टिप्लेक्सवाले समाजसेवा करायला बसलेले नाहीत. त्यांनाही बिझनेस करायचा आहे.  हिंदी चित्रपटाला १५ शो आणि मराठीला एक शो अशी स्पर्धा नसते. त्यामुळे सरकारनं मराठी चित्रपटासाठी खरंतरं काहीतरी कायदा करायला हवा पण सतत त्याविषयी बोलून आता कंटाळा आलायं.''  

टॅग्स :सुबोध भावे