Join us

सुमित राघवनने बाल कलाकार म्हणून केले आहे हे काम….काय आहे ते जाणून घ्या…

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 13:05 IST

सध्या चंद्रकांत कुलकर्णी यांच्या 'हॅम्लेट' या नाटकात काम करत आहे. बालकलाकार म्हणून नाटकात काम करण्याचा प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला आणि नाटकात काम करायला आवडतं अशी प्रतिक्रिया सुमितने दिली आहे.

छोटा पडदा अनेक वर्षे गाजवल्यानंतर अभिनेता सुमित राघवन आता मराठी सिनेमा आणि रंगभूमी गाजवत आहे. मात्र सुमितने याआधी बऱ्याच वर्षाआधी मराठी रंगभूमीवर काम केले आहे. बालकलाकार म्हणून मराठी नाटकातून अभिनयाची झलक दाखवली आहे. सुमित सध्या चंद्रकांत कुलकर्णी यांच्या 'हॅम्लेट' या नाटकात काम करत आहे. बालकलाकार म्हणून नाटकात काम करण्याचा प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला आणि नाटकात काम करायला आवडतं अशी प्रतिक्रिया सुमितने दिली आहे. नाटक हे असं माध्यम आहे की तुमच्या अभिनय कौशल्यात त्यामुळे आणखी बहार येते आणि विशेष म्हणजे त्यामुळं तुमचं टायमिंग सुधारतं असं सुमित म्हणतो. हॅम्लेट हे नाटक करताना कुठलीही अडचण वाटत नसल्याचे सुमितने स्पष्ट केले आहे. 

त्यातच मराठी उत्तम बोलत असल्याने हे नाटक करताना निश्चित आणि बिनधास्त वाटत असल्याचे सुमितने सांगितले आहे. सुमितने मराठी सिनेमातूनही रसिकांची मने जिंकली आहेत. बकेट लिस्ट या सिनेमात सुमितने भूमिका साकारली होती. यात ‘मोहन साने’ची भूमिका साकारताना एक वेगळीच मजा आली. माधुरी ही माझ्याच काय सगळ्यांच्याच मनातली हिरॉइन आहे. तिच्याबरोबर काम करावं अशी माझीही इच्छा होती. ‘बकेट लिस्ट’मुळे ती पूर्ण झाल्याचे सुमित म्हणाला. यानंतर त्याने रुपेरी पडद्यावर डॉ.श्रीराम लागू यांची व्यक्तीरेखाही मोठ्या खुबीने साकारली आहे.