अभिनेता स्वप्निल जोशीचा ‘बळी’ या हॉरर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले. एका व्यक्तींचा भीतीदायक चेहरा रक्त आणि डोळ्यांत क्रॉसच्या प्रतिमांचा वातावरण दर्शविले गेले आहे. हे भीतीदायक पटकथेची जाणीव देते ती (एलिझाबेथ कोण आहे) च्या टॅग लाइनसह , त्यातून अघटीत आणि भितीपूर्ण वातावरणाचे सुतोवाच होते. त्यातून या चित्रपटाची कथा आणि पटकथा भीतीदायक असेल, याची कल्पना येते आणि त्यातून प्रेक्षकांना काही धडकी भरवणारे प्रसंग पडद्यावर अनुभवता येतील याची खुणगाठ बांधता येते.
या हॉरर मराठी चित्रपटाचा मोठ्या प्रमाणावर बोलबाला आहे. या चित्रपटाची निर्मिती जीसिम्सने केली आहे.या चित्रपटाबद्दल स्वप्निलला खूप उत्सुकता आहे. तो म्हणतो, “यंदा मी नव्या प्रकारातील चित्रपट करेन, असे आश्वासन गेल्यावर्षी मी प्रेक्षकांना दिले होते. त्या दृष्टीने मी उचललेले हे एक पाऊल आहे. हॉरर चित्रपट करण्याची संधी मला मिळते आहे.मला पूर्ण खात्री आहे की, आम्ही एकत्रितपणे प्रेक्षकांना घाबरवू शकतो. आणि त्याचा प्रेक्षक चांगलाच आनंद घेतील.”
तो पुढे म्हणतो, “जर तुम्ही थोडेसा मागे जाऊन विचार केलात तर तुमच्या लक्षात येईल की मराठी चित्रपट क्षेत्राने ‘लपाछपी’च्या आधी कधीही हॉरर चित्रपटाचा प्रयोग केलेला नाही. हॉरर विनोदी चित्रपटांचे प्रयोग झाले, पण तुमची झोप उडवेल असा मराठी चित्रपट झाला नाही. मला वाटते ‘बळी’ ती पोकळी नक्कीच भरून काढेल. त्यापेक्षाही अधिक महत्वाचे म्हणजे चित्रपटाची कथा तुम्हाला घाबरवून टाकते. नेहमी ज्याप्रमाणे भारतीय हॉरर चित्रपटांमध्ये होते तसे भडक संगीत आणि उड्या मारून भीती निर्माण करण्याचा प्रकार येथे नाही.”