Join us

शनायाच्या जीवनातील ‘स्वीट’ व्यक्ती आहे हा अभिनेता, लग्नबाबत इशा म्हणते....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 06:00 IST

ईशा केसकरने तिच्या जीवनातील खास व्यक्तीची सोशल मीडियाद्वारे फॅन्सना माहिती दिली.

कलाकार मंडळींच्या खासगी जीवनाविषयी रसिकांना जाणून घेण्याची इच्छा असते. त्यांच्या जीवनातील लहानसहान गोष्टी जाणून घ्यायला रसिक आतुर असतात. कलाकार मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून रसिकांशी संवाद साधतात. आपल्या जीवनातील गोष्टी, फोटो ते सोशल मीडियावर शेअर करतात. नुकतंच शनाया फेम अभिनेत्री ईशा केसकर हिनं तिच्या जीवनातील खास व्यक्तीची सोशल मीडियाद्वारे फॅन्सना माहिती दिली. सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संवाद साधला आहे. दरम्यान ईशाला ती डेट करत असलेल्या अभिनेत्याला पहिल्यांदा कुठे भेटली, लग्न कधी करणार असे अनेक प्रश्न विचारण्यात आले. ‘पूछ ना!’ असे लिहित इन्स्टाग्रामवर तिने ask me anything या फिचरद्वारे फॅन्सशी संवाद साधला. 

 

ईशाच्या जीवनातील खास व्यक्ती म्हणजे अभिनेता ऋषी सक्सेना, त्याला पहिल्यांदा कुठे भेटली?, त्यांच्या नात्याला किती वर्षे झाली, आवडती स्वीट डिश कोणती, लग्नाबद्दल काय विचार आहे? असे अनेक प्रश्न तिच्या फॅन्सनी विचारले. यावर चला हवा येऊ द्याच्या सेटवर ऋषीला भेटल्याचे आणि २९ जुलै २०१९ला त्याला २ वर्षे होणार असल्याचे ईशाने सांगितले. ऋषी आणि ईशाच्या रिलेशनशिपला २ वर्षे पूर्ण होत असले तरी लग्नाचा सध्या तरी विचार नसल्याचेही ईशाने स्पष्ट केले आहे. 

याशिवाय ईशाची आवडती स्वीट डिश कोणती असा प्रश्नही विचारण्यात आला. त्यावर ईशाने ऋषी सक्सेनाचा फोटो पोस्ट करत ‘हा आणि सगळं स्वीट’ असं उत्तर दिलं आणि फॅन्सची मनं जिंकली. सध्या ईशा छोट्या पडद्यावरील 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत काम करतेय. ही मालिका सध्या निर्णयाक वळणावर आहे. मालिकेच्या कथानकातील ट्विस्ट आणि टर्न्समुळे मालिका रसिकांना भावतेय. या मालिकेतील शनाया म्हणजे अभिनेत्री इशा केसकरचा अभिनय रसिकांना भावतोय. रसिका सुनीलची एक्झिट झाल्यानंतर इशानं त्याला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय उपेंद्र सिधये यांच्या ‘गर्लफेंड’ या चित्रपटातही ती झळकणार आहे. 

टॅग्स :ईशा केसकरऋषी सक्सेना