अभिनेत्री अमृता खानविलकर (amruta khanvilkar) ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. अमृताला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. 'नटरंग', 'साडे माडे तीन', 'चोरीचा मामला' अशा मराठी सिनेमांमध्ये तिने काम केलंय. याशिवाय 'फूँक', 'राजी' अशा बॉलिवूड सिनेमांमध्येही अमृता झळकली आहे. अमृताने नुकतंच लोकमत सखीला दिलेल्या मुलाखतीत तिच्या मनातील भावना शेअर केल्या आहेत. अमृता श्री स्वामी समर्थांविषयी काय म्हणाली?
अमृताने श्री स्वामी समर्थांविषयी श्रद्धा व्यक्त करुन म्हणाली की, "मी स्वामींजवळ एवढंच मागते की, कधीही कामाची कमी नको. उत्कृष्ट पद्धतीने मी काम करु पाहतेय, त्यासाठी प्रयत्न करतेय आणि ते काम लोकांपर्यंत यायला पाहिजे. तिथून मला सर्व काही मिळतं मग ते आरोग्य असो, माझ्या इच्छा असो, जे काही मला देवाला द्यायचं ते मला तिकडून मिळतं, त्या एनर्जीमधून मिळतं."