कलाकारांनी अभिनयासह दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवणं ही काही नवी बाब नाही. गेल्या काही वर्षात मराठी चित्रपटसृष्टीत अनेक कलाकारांनी अभिनयासोबतच दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्राक स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. सुबोध भावे, प्रसाद ओक, मृणाल कुलकर्णी यापैकी काही यशस्वी नावं. याच यादीत आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा समावेश झाला आहे. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आता सिनेमा दिग्दर्शनाची नवी इनिंग सुरु करत आहे. कट्यार काळजात घुसली या सिनेमात तिने आपल्या अभिनयाची ताकद दाखवून दिली. यानंतर काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या 'शिकारी' सिनेमात फुलवा आणि फर्जंद सिनेमात केसरी या सिनेमात तिने हटके भूमिका साकारत आपल्यातील अभिनय कौशल्याची वेगळी चुणूक दाखवून दिली. आता मात्र मृण्मयी रसिकांना सुखद धक्का देणार आहे. दिग्दर्शिका ही नवी भूमिका ती रिअल लाईफमध्ये पार पाडणार आहे. मृण्मयीला नेहमीच काही ना काही हटके करण्याचा ध्यास होता. त्यातच दिग्दर्शन करणे हे तर तिचे सुरुवातीपासूनच स्वप्न होतं. 'के सरा सरा' या सिनेमापासून मृण्मयी दिग्दर्शनाची नवी इनिंग सुरु करत आहे. दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी मृण्मयीकडे ३ ते ४ स्क्रीप्ट्स होत्या.गेल्या ४ वर्षांपासून ती यावर विचार करत होती. काही तरी आव्हानात्मक आणि वेगळे करण्याच्या विचारातून अखेर तिने 'के सरा सरा' या सिनेमाच्या कथेची निवड दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी केली.या सिनेमाची कथा नातेसंबंधांवर आधारित असेल. मधुचंद्रानंतर पती पत्नीच्या नात्यात कसा ट्विस्ट येतो यावर आधारित हा सिनेमा असेल. हा सिनेमा वर्षअखेरीस रसिकांच्या भेटीला येईल.
प्रत्येक व्यक्तीला आपल्या लाइफ पार्टनरसोबत कुठे तरी लांब फिरण्यास जाण्याची इच्छा असते. तसेच त्याच्यासोबतची ही एन्जॉय ट्रीप अविस्मरणीय राहावी असे प्रत्येकाला वाटत असते.तिने नुकतेच फेसबुकवर स्वप्नीलसोबत ट्रीपचा आनंद घेत असल्याचे काही झक्कास फोटो अपलोड केले आहेत. तसेच या फोटोमध्ये ती पॅराग्लाडिग करतानादेखील दिसत आहे. तिचे हे फोटो पाहता ती आज है उपर, आँसमा नीचे अशाच काही हॅपी मूडमध्ये दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे.तिच्या या फोटोला प्रचंड लाइक्स मिळताना दिसत आहे. तसेच त्यांच्या या फोटोला रब ने बना दी जोडी, अशीच आनंदी राहा अशा अनेक कमेंन्ट पाहायला मिळत आहे.